Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच नाशिक फोटोगॅलरी

Photo Gallery : ‘मेट् बीकेसी उत्सव’ला सुरुवात; ‘ट्रॅडीशनल डे’ने कॅम्पसमध्ये पारंपारिक वेशभूषा

Share
नाशिक | प्रतिनिधी
नाशिकमधील मेट भुजबळ नॉलेज सिटीमध्ये आजचे खास आकर्षण होते ते ट्रॅडीशनल डे चे. कॅम्पसमध्ये सर्वजण पारंपारिक वेशभूषेत आले होते.
‘मुंबई एज्युकेशन ट्रस्ट’ या संस्थेचा यंदा ३० वर्षाचा पर्ल महोत्सवी वर्ष आहे. ‘डिफाईनिंग फ्युचर’ या टॅग लाईन नुसार साजरा होत असलेल्या संस्थेच्या या उत्साहामुळे यंदा डेजचे आकर्षण काही औरच आहे.
३ ते ४ दिवस चालणाऱ्या या उत्सवात मेट्स गॉट टॅलेंट, मनी मॅगनेटीझम, रॉक शो, डान्स वर्कशॉप, झुंबा वर्कशॉप, आय चेकअप, फायनान्सशियल मॅनेजमेंट, स्टॉल्स, टेक्नोफेस्ट, क्वीझ कॉम्पीटीशन, पेंटिंग वर्कशॉप, आय चेकअप, फोटोग्राफी, रायफल शो, एअर शो, गरबा, रोबो वर्क शॉप, नुक्कड, भाडीपा ई. महत्वपुर्वक वर्कशॉप असून आजपासून दि. १८ जानेवारी पर्यंत हे वर्कशॉप आहेत.
उत्सव समाप्ती पूर्व म्हणजेच १९ जानेवारी रोजी कल्चर नाईट म्हणजेच ग्रंड फिनाले चे संध्याकाळी ६ वाजता आयोजन केले आहे.
संस्थेचे समीर भुजबळ यांनी उत्सव हा विद्यार्थांना विद्यार्थांसाठी केलेला सोहळा असल्याचे सांगत शुभेच्छा  दिल्या. तर शहरातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार राजेश सावंत यांनी या प्रसंगी सुंदर चित्र रेखाटले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!