निफाडमध्ये ऊसाची ट्रॉली उलटली; दोन दुचाकीस्वार जखमी

0
निफाड | निफाड न्यायालयासमोर ऊसाची ट्रॉली उलटली. या घटनेत उसाच्या मोळ्याच्या खाली दोन दुचाकीस्वार दाबले गेले.

दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. कादवा कारखान्यासाठी स्वराज ट्रॅकटर उसाच्या भरलेल्या दोन ट्रॉल्या घेऊन जात असतांना न्यायालयासमोर असलेल्या गतिरोधकावर पुढील ट्रॉलीचा मागे जोडलेल्या ट्रॉलीला झटका बसल्याने मागच्या ट्रॉलीचा हुक तुटला.

यात मागची ट्रॉली वेगळी होऊन पलटी झाली. याचवेळी या ट्रॅकटर जवळून दोन मोटरसायकल स्वार जात असतांना ते उसाखाली दाबले गेले नागरिकांनी प्रसंगावधन राखत तात्काळ ऊस बाजूला करीत दबलेल्या दोघांना बाहेर काढून उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले.

या परिसरात जवळच शाळा आहे. शाळा सुटण्याचा अर्धा तास आधीच हि घटना घडल्याने मोठा अनर्थ टळला आहे. अद्यापही याठिकाणी मदत कार्य सुरू आहे.

दोन-दोन ट्रॉल्या जोडून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर  चालकांवर प्रशासन कारवाई कधी करणार याकडे लक्ष लागून आहे.

LEAVE A REPLY

*