Type to search

नाशिक मार्केट बझ

टोयोटा ग्लांझाचे नाशिकमध्ये अनावरण

Share

नाशिक । प्रतिनिधी

वासन टोयोटा शोरूम येथे टोयोटा आणि मारुती या कंपन्यांदरम्यान झालेल्या करारानुसार प्रीमियम हॅचबॅक सिरीजमधील पहिलीच संयुक्त निर्मिती असलेली ग्लांझा कारचे अनावरण पोलीस आयुक्त विश्वास नांगरे- पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमात उपस्थित सर्व ग्राहक व कारप्रेमींसाठी विविध खेळ, प्रश्नमंजुषासह बक्षिसांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा उपस्थितांनी मनसोक्त आनंद घेतला.

तर, सिटी सेंटर मॉल येथील कार्यक्रमात टोयोटाचे रिजनल मॅनेजर तन्मय भट्टाचार्य यांच्या प्रमुख उपस्थितीत वासन टोयोटातर्फे आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या योगेश तात्पुरकर, सुनंदा सांजे, पंकजराव आहेर या विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. यावेळी फ्लॅश मॉबचे आयोजन करण्यात आले होते.

टोयोटा ग्लांझाकारचे अनावरण झाल्यानंतर कार विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली. अनेक इच्छुकांनी कारची टेस्ट ड्राईव्ह घेतली. एकूण 6 जणांनी कार बुकिंग करण्याची इच्छा असल्याचे सांगितले, अशी माहिती वासन टोयोटा समूहाचे उपाध्यक्ष तेजींदरसिंग बेदी यांनी दिली.

याप्रसंगी प्रदीप वासन (संचालक, वासन टोयोटा), तन्मय भट्टाचार्य (रिजनल मॅनेजर, टोयोटा मोटर्स), सुरेंद्र पुजारी (सीइओ, वासन टोयोटा समूह), तेजींदरसिंग बेदी (उपाध्यक्ष, वासन टोयोटा समूह), श्रीकांत नायक (जनरल मॅनेजर, वासन टोयोटा समूह) आदींसह वासन समूहाचे सेवक उपस्थित होते. सूत्रसंचालन अनुजा यांनी केले. सुरेंद्र पुजारी यांनी आभार मानले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!