भंडारदर्‍यात पर्यटकांसाठी अनोखी पर्वणी

0
भंडारदरा (वार्ताहर) – भंडारदरा धरणाच्या मुख्य भिंतीच्या व्हॉल्वद्वारे वर्षभरात प्रथमच विसर्ग सोडण्यात आला असल्याने धरणाच्या पायथ्याशी असणार्‍या बगीचा परीसरात वातानुकुलीत वातावरण निर्माण झाले आहे. रखरखत्या उन्हात देखील पर्यटक आकर्षित होत आहेत. व या अनोख्या पर्वणीचा आनंद घेत आहेत.
राज्यभरात सूर्य आग ओकत असून काही जिल्ह्यांमध्ये तर उष्णतेने कहर केल्यामुळे उन्हाचा पारा 45 डीग्री सेल्सीअसपर्यंत पोहचला आहे. मात्र घनदाट जंगल व निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या भंडारदरा धरण परिसरात मात्र वातानुकुलीत गारवा आहे.
कारण गेल्या 80 दिवसांपासून विद्युतगृह क्र.1 द्वारे सोडण्यात आलेला विसर्ग बंद झाल्या कारणाने धरणाच्या मुख्य भींतीच्या व्हॉल्वद्वारे 621 क्युसेक्स् व वायपीसद्वारे 394 क्युसेक्सने सांयकाळी 6 वाजता विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला असून तो निळवंडे धरणात जमा होणार आहे. विसर्ग किमान 8 ते10 दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. विसर्ग सोडतेवेळी धरणात 2 हजार 321 दलघफू इतका पाणीसाठा शिल्लक होता.

सध्या सुरू असलेल्या विसर्गासाठी साधारण 600 दलघफू पाणी खर्ची होऊन 1600 ते 1700 दललफू पाणीसाठा शिल्लक राहील. धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे रखरखत्या उन्हाळ्यात देखील प्रचंड गारवा पर्यटक अनुभवत आहेत. धबधब्याचे मनमोहक सौंदर्य, भंडारदरा परिसरात सध्या सुरू असलेल्या काजवा महोत्सवसाठी येणार्‍या काजवाप्रेमी पर्यटकांसाठी ही पर्वणी ठरत आहे.त्यातच शनिवार, रविवार व सुट्यांचा कालावधी यामुळे पर्यटकांची झुंबड उडालेली पाहावयास मिळत आहे. तर केवळ पावसाळ्यामध्येच दिसणारे धबधबे उन्हाळ्यात पाहवयास मिळत असून सोबत काजवा महोत्सव असा दुग्धशर्करा योग जुळून आल्याने पर्यटक मनमुराद आनंद घेत आहेत.

LEAVE A REPLY

*