Saturday, April 27, 2024
Homeनाशिकगंगापुररोड, शांतीनिकेतन चौक व माणेक्षानगर द्वारका प्रतिबंधीत क्षेत्र; शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या...

गंगापुररोड, शांतीनिकेतन चौक व माणेक्षानगर द्वारका प्रतिबंधीत क्षेत्र; शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या ११ वर

नाशिक ।  प्रतिनिधी

नाशिक शहरातील करोना विषाणू बाधीत रुग्णांचा आकडा 18 पर्यत गेला असुन यातील एका महिलेचा मृत्यु झाल्याचे समोर आले आहे. यामुळे आता नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. सोमवारी एका महिला डॉक्टराला करोनाची बाधा झाल्याचे समोर आल्यानंतर आज (दि.5) मृत गरोदर महिलेस करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ही महिला शहरातील बजरंगनगर भागातील आहे. आता शहरातील प्रतिबंधीत क्षेत्राची संख्या 11 झाली असुन शहरातील बहुतांशी भाग आता प्रतिबंधीत क्षेत्र झाला आहे.

- Advertisement -

शहरात गेल्या 26 एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टराला करोना झाल्याचे समोर आले होते. यामुळे हे डॉक्टर राहत असलेला म्हसरुळ शिवारातील वृंदावन नगर (कै. किशोर सुर्यवंशी मार्ग) हा परिसर प्रतिबंधक क्षेत्र घोषीत करण्यात आला होता.

त्यानंतर 2 मे रोजी जिल्हा रुग्णालयातील जेष्ठ डॉक्टर व महापालिका क्षेत्रात कार्यरत असलेला फार्मासिस्ट अशा दोन आरोग्य सेवकांना करोना झाल्याचे समोर आले होते.

आता सोमवारी (दि.4) रोजी शहरातील एका खाजगी रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरला करोना झाल्याचे अहवालातून समोर आले आहे. ही महिला द्वारका भागात असलेल्या जनरल वैद्यनगर भागातील वृंदावन कॉलनीत राहत असल्याने महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी हा परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणुन जाहीर केला आहे.

या परिसरात निर्जंतुकीकरणाचे काम करण्यात आले असुन याठिकाणी आरोग्य सर्व्हेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, आज प्रतिबंधीत क्षेत्र म्हणुन अगोदरच घोषीत असलेल्या बजरंगवाडी येथील एका गरोदर महिलेंचा 2 मे रोजी मृत्यु झाल्यानंतर तिला करोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सिन्नर येथून नाशिकला आली होती. या मृत्युनंतर आता याभागात पुन्हा आरोग्य सर्व्हे सुरू करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या