Type to search

आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

तमिळनाडूमध्ये गज तूफान धडकण्याची शक्यता, शाळा- महाविद्यालये बंद

Share

नवी दिल्ली: तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात आज (गुरुवार) गज चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हे वादळ तयार झाले आहे. दरम्यान दोन्ही राज्यातील किनारपट्टी भागातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. चेन्नईतील अनेक भागात वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे.

तमिळनाडूमध्ये येणाऱ्या या आपत्तीमुळे प्रचंड पाऊस पडणार असल्याचे ही सांगितले जात आहे. मात्र तमिळनाडूमधील सर्व मच्छिमारांना लवकर समुद्रातून बाहेर पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर शाळा- महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. या गाजा तुफानामुळे 110 किमी प्रति तास असे वारे वाहत आहेत.

तर संध्याकाळपर्यंत वाऱ्याचा वेग वाढून तो 125 किमी प्रति तास होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एवढच नसून नौसेना या तुफानाला दोन हात करण्यासाठी सज्ज झाली असून नागरिकांच्या सुरक्षतेसाठी सर्व गोष्टींची तयारी करण्यात आली आहे.

आज तमिळनाडूच्या उत्तर दिशेला आणि आंध्र प्रदेशाच्या दक्षिणेकडील तट पार केल्यास हे तुफान कमी होण्याची शक्यता बाळगली जात आहे.  दरम्यान गज वादळामुळे महाराष्ट्रातील काही भागात ढगाळ वातावरणाची शक्यता असल्याचे पुणे हवामान विभागाने सांगितले. तर मराठवाड्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे विभागाने म्हटले आहे.

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!