Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यालसींच्या दोन डोसमधील अंतर कमी करावे

लसींच्या दोन डोसमधील अंतर कमी करावे

देवळाली कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

सरकारने राज्यशासन व आरोग्य प्रशासनाच्या सहकार्याने देशातील शंभर कोटी नागरिकांच्या लसीकरणाचा Vaccination टप्पा पूर्ण केला त्याबद्दल खा हेमंत गोडसे MP Hemant Godse यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया Union Health Minister Mansukh Mandvia यांची भेट घेत अभिनंदन करतांना दोन डोस मधील अंतर 84 दिवसांचे अंतर कमी करावे तसेच मुलांच्या लसीकरणाची मोहीम गतिमान करावी असे साकडे नामदार मांडविया यांना घातले.

- Advertisement -

गेल्या वर्षी करोनाने देशभरात थैमान घातले होते. हजारो नागरिकांना जीव गमवावा लागला. लस उपलब्ध झाल्याने केंद्र आणि राज्य शासनाकडून देशभरात लसीकरण मोहीम राबविण्यात आली, त्यामुळेच शंभर कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी उत्तम नियोजन करून महाराष्ट्र राज्यात लाखो नागरिकांचे लसीकरण करून घेत त्यांना सुरक्षित केले आहे.

या पार्श्वभूमीवर खासदार गोडसे यांनी ना मांडविया यांची भेट घेत सरकारचे अभिनंदन केले . सुरुवातीला लसीची उपलब्धता अल्प असल्याने सरकारने दोन डोस मधील अंतर 85 दिवसांचे ठेवले होते. परिणामी दोन डोस पूर्ण होण्यास मोठा कालावधी लागत असल्याने नागरिकांना विविध परवानग्यासंह अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.यामुळे देशभरातील नागरिक त्रस्त आहेत.

आता देशभरातील सर्वच लसीकरण केंद्रावर लसीची उपलब्धतता मोठ्या प्रमाणावर असल्याने दोन डोस मधील अंतर कमीतकमी दिवसांचे करावे , याबरोबरच लवकरच शाळा सुरू होणार असल्याने लहान मुलांच्या लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवावी अशी आग्रही मागणी खा. गोडसे यांनी केली

- Advertisment -

ताज्या बातम्या