Friday, April 26, 2024
Homeनाशिकमहासभा ऑफलाइन घ्या- शिवसेना

महासभा ऑफलाइन घ्या- शिवसेना

नाशिक । प्रतिनिधी

महापालिका निवडणूक जवळ येत आहे, तसतसा विकासकामांचा सपाटा लावण्यात येत आहे. यामुळे महासभा ऑनलाइन न होता ऑफलाइन पद्धतीने महाकवी कालिदास कलामंदिर सभागृहात व्हावी, जेणेकरून नगरसेवकांना त्यांचे मुद्दे मांडण्यासाठी तांत्रिक अडचण येणार नाही, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने महापालिका आयुक्त कैलास जाधव यांना पत्र देऊन करण्यात आली आहे.

- Advertisement -

करोनाच्या नावावर सत्तारूढ भाजपकडून ऑनलाइन सभांचा सपाटा लावून संधीसाधूपणा केला जात असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते व गटनेता विलास शिंदे यांनी केला असून, ऑफलाइन महासभेकरिता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी घ्यावी, अशी सूचनाही बोरस्ते यांनी आयुक्तांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

महाकवी कालिदास कलामंदिर सभागृहाची क्षमता सुमारे सातशे आसनांची आहे. या सभागृहात सर्वसाधारण सभा घेतल्यास 127 नगरसेवक, खातेप्रमुख व अत्यावश्यक कर्मचारी विचारात घेता साधारणतः 250 लोकांमध्ये ही सभा होऊ शकते, असे निवेदनात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या