Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनिवडणूक कामात हलगर्जीपणा नायब तहसीलदारांना भोवला

निवडणूक कामात हलगर्जीपणा नायब तहसीलदारांना भोवला

नाशिक l Nashik

निवडणूक कामकाजात हलगर्जीपणा चार नायब तहदिलदारांना भोवला आहे.

- Advertisement -

मतदार नोंदणी आणि मतदार याद्या अद्यावतीकरणाची प्रक्रीयेत दुबार नावांची नोंदणीबाबत टाळाटाळ करणाऱ्या जिल्हयातील चार तालुक्यांतील चार नायब तहसीलदारांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

निवडणूक विभागाच्या आदेशाने स्थानिक तहसीलदारांनी या नोटीसा बजावल्या आहेत. करोना काळातही निवडणूक विभागाचे ऑनलाईन पध्दतीने कामकाज सुरुच होता. त्यानुसार सप्टेंबरमध्ये अंतिम मतदार यादीही प्रसिध्द कऱण्यात आली असून आता प्रारुप मतदार यादीचे काम सुरु आहे.

या कामकाजाची अंमलबजावणी योग्य पध्दतीने करण्याची जबाबदारी त्या-त्या तालुक्यांच्या तहसीलदार आणि नायब तहसीलदारांवर होती. परंतू सिन्नर, मालेगाव, चांदवड आणि कळवण तालुक्यातील प्रत्येकी एका नायब तहसीलदारांनी दुबार नावांची योग्य तपासणी केली नसल्याचे समोर आले.

त्यामुळे या चारही नायब तहसीलदारांना आता कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यानुसार लागलीच निवडणूक विभागाच्या आदेशानुसार तहसीलदारांनी थेट कारवाईचा बडगा उगारला आहे.

प्राथमिक स्तरावर त्यांना नोटीसा देत त्यांचे म्हणणे ऐकूण घेतल्यानंतर पुढील कारवाईची प्रक्रीया केली जाणार असल्याचे निवडणूक विभागाच्या वतीने सांगितले आहे. स्थानिक तहसीलदारांकडेच ते आपले म्हणणे सादर करणार असल्याने त्यांच्या स्तरावरुन ही कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या