Friday, April 26, 2024
Homeनाशिकनाशिक कृउबा समिती ग्रामपंचायत प्रारूप यादीवर हरकत

नाशिक कृउबा समिती ग्रामपंचायत प्रारूप यादीवर हरकत

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती (Nashik Agricultural Produce Market Committee) निवडणुकीच्या (election) पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar), पेठ (peth), नाशिक (nashik) तालुका या ग्रामपंचायतींच्या विद्यमान सदस्यांची नांवे अंतिम प्रसिध्द होणाऱ्या मतदान यादीमध्ये (voter list) समाविष्ट करण्यात येऊन तशी यादी अंतिम यादी प्रसिध्द करण्यात यावी,

- Advertisement -

अशी मागणी सहायक जिल्हा उपनिबंधक मनीषा खैरनार (Assistant District Deputy Registrar Manisha Khairnar) यांच्याकडे सारस्तेचे ग्रामपंचायत सदस्य विनायक माळेकर, सारस्ते आदि.वि.वि.कार्यकारी संस्था संचालक बहिरु मुळाणे, राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) तालुका अध्यक्ष युवराज कोठुळे यांनी केली आहे.

निवेदनात (memorandum) म्हटले आहे कि, आम्ही अर्जदार वरील ठिकाणचे कायमस्वरुपी रहिवासी असून त्र्यंबकेश्वर तालुका (Trimbakeshwar Taluka) तसेच पेठ तालुका (peth taluka), नाशिक तालुका असे मिळुन नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे (Nashik Agricultural Produce Market Committee) कार्यक्षेत्र आहे.

बाजार समितीमध्ये मतदार (voter) म्हणुन प्रत्येक गावातील ग्रामपंचायत सदस्य (Gram Panchayat Member) व तसेच विविध कार्यकारी सोसायटी सदस्य यांच्या मतदानावरुन कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकांची निवड केली जाते. पेठ, नाशिक व त्र्यंबकेश्वर तालुका यातील ग्रामपंचातीचे विद्यमान सदस्यांची नावाची प्रारूप यादी प्रसिध्द केलेली या प्रारूप यादीमध्ये पेठ तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतीमधील विद्यमान सदस्यांनी नांवे नमुद करण्यात आलेली नाही.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwar Taluka) ५७ ग्रामपंचायतीमधील विद्यमान सदस्यांची नांवे नमुद करण्यात आलेली नाही.तसेच नाशिक तालुक्यातील १८ ग्रामपंचायतीमधील विद्यमान सदस्यांची नांवे नमुद करण्यात आलेली नाही. सदरची यादी ही प्रारूप यादी असल्यामुळे या यादीमध्ये दुरुस्ती होणे आवश्यक व गरजेचे आहे. त्र्यंबकेश्वर, पेठ, नाशिक तालुका या ग्रामपंचायतींच्या विद्यमान सदस्यांची निवडणुक झाल्यानंतर ग्रामपंचायत गठीत ही दि. १/११/२०२२ आत झालेली असून

त्यामुळे सदर ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्यांची नावे सदर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नुकत्याच प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रारूप यादीमध्ये समाविष्ट नाही. सदरचे नांवे ही जाणुन बुजुन व हेतुपुरस्करपणे वगळण्यात आल्याचे दिसत आहे.

अशा परिस्थितीत सदरची नावे ही अंतिम प्रसिध्द होणाऱ्या यादीमध्ये नमुद करण्यात आल्यानंतरच अंतिम यादी प्रसिध्द करण्यात यावी. तसे न झाल्यास विद्यमान ग्रामपंचायतीचे सदस्यांना आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीपासुन वंचित राहावे लागेल ,असेही निवेदनात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या