Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यादेशात कराेनाचा आकडा सहा लाखांवर

देशात कराेनाचा आकडा सहा लाखांवर

देशात कराेनाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सहा दिवसांत एक लाख रुग्ण वाढले आहे. आता देशाचा कराेना बाधितांचा आकडा सहा लाखापेक्षा जास्त झाला आहे. त्यात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून त्याची संख्या १ लाख ८० हजार आहे. कराेना रुग्णांच्या संख्येत जगात भारत चाैथ्या स्थानावर पाेहचला आहे.

भारतात १ लाख रुग्णसंख्येसाठी ११० दिवस लागले हाेते. परंतु गेल्या ४५ दिवसांतच पाच लाख नवे रुग्ण आढळले आहे. www.covid19india.org/ या बेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत ९० लाख ५६ हजार चाचण्या झाल्या आहेत. महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली आणि गुजरात ही चार मिळूनच चार लाख रुग्ण आहेत. कराेनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्ये देशात १७ हजार ८४८ आहे.

- Advertisement -

देशात गेल्या २४ तासांत तब्बल १९ हजार १४८ नवीन प्रकरणे समोर आली. तर, ४३४ जणांचा मृत्यू झाला. देशात सध्या २लाख २६ हजार ९४७ सक्रिय रुग्ण आहेत तर, १७ हजार ८३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत ३ लाख ५९ हजार ८५९ रुग्ण निरोगी होऊन घरी परतले आहेत. भारतातील रुग्ण बरे होण्याचा दर हा ६० % आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या