Thursday, April 25, 2024
Homeनगरवर्षभरानंतर ‘स्थायी’ची आज प्रत्यक्षात सभा

वर्षभरानंतर ‘स्थायी’ची आज प्रत्यक्षात सभा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्रीताई घुले यांच्या अध्यक्षतेखाली आज (शुक्रवारी) स्थायी समितीची सभा आयोजित करण्यात आली आहे.

- Advertisement -

गतवर्षी फेबु्रवारी महिन्यात स्थायी समितीची प्रत्यक्षात सभा झाली होती. त्यानंतर करोना संकटामुळे वर्षभर जिल्हा परिषदेच्या कोणत्याच सभा प्रत्यक्षात झालेल्या नाहीत. मात्र, आता करोना संकट कमी झाले असून वर्षभरानंतर आज स्थायीची प्रत्यक्षात सभा होत आहे.

या सभेत विशेष घटक योजनेअंतर्गत जनावरांना जंतूनाशक पुरविण्यात येणार्‍या 40 लाख रुपये खर्चास, पशुसंवर्धन प्रदर्शन व प्रचार कार्यक्रमाच्या खर्चास व इतर विभागांच्या मंजूर खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याचा विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

सभेला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, बांधकाम व कृषी सभापती काशिनाथ दाते, अर्थ व पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख, महिला व बालकल्याण समिती सभापती मीराताई शेटे, समाजकल्याण समितीचे सभापती उमेश परहर तसेच अजय फटांगरे, संदेश कार्ले, माधवराव लामखडे, सदाशिव पाचपुते, सुप्रिया पाटील, महेश सूर्यवंशी, अनिता हराळ आदी सदस्यांसह झेडपीचे प्रभारी सीईओ ज्ञानेश शिंदे व इतर विभागांचे अधिकारी उपस्थित राहाणार आहेत.

ही सभा ऑफलाईन होणार असून, या सभेत गेल्या महिन्यातील सभेचे कार्यवृत्त वाचून कायम करण्यात येणार आहे. 2020-21 या वर्षासाठी माध्यमिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण फी व परीक्षा फीसाठी 35 लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. हा निधी खर्च करण्यास प्रशासकीय मान्यता दिली जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या