Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकनिधीसाठी जि.प. सदस्यांची धावपळ

निधीसाठी जि.प. सदस्यांची धावपळ

नाशिक । प्रतिनिधी Nashik

विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांचा ZP Members कालावधी केवळ दोन-तीन महिन्यांचा बाकी राहिला आहे. त्यामुळे आपल्या गटात अधिकाधिक कामे करून निवडणुकीला Elections सामोरे जाण्याची तयारी सदस्यांकडून सुरू असल्याने निधीसाठी funds सदस्यांची धावपळ सुरू आहे. मात्र, लघुपाटबंधारे विभागाचे नियोजनच अद्याप झालेले नसल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सदस्यांना किती निधी मिळणार याबाबत स्पष्ट माहिती मिळत नसल्याने सदस्य बुचकळ्यात आहे.

- Advertisement -

पुढील वर्षी जिल्हा परिषेच्या निवडणुका होत आहे. या पार्श्वभूमीवर, समित्यांनी लवकर निधीचे नियोजन करावे,असे एप्रिल महिन्यापासून सांगितले जात होते. त्यासाठी अनेकदा बैठका देखील झाल्या.

मात्र, अद्यापही समित्यांकडून निधीचे नियोजन होत नसल्याचे चित्र आहे. लघुपाटबंधारे विभागातील पूर्व व पश्चिमचे निधीचे नियोजन झालेले नाही. या विभागातंर्गत बंधारे, बंधारे दुरूस्तीला निधी सदस्यांना प्राप्त होतो. मात्र,सदस्यांना अद्याप हा निधी मिळालेला नाही. त्यासाठी सदस्यांकडून पदाधिकाजयांना विचारणा होत आहे. यातच सदस्यांना काही ठराविक रकमेचे पत्र मागवले जात आहे.

काही सदस्यांना पाच लाखांचे तर, काही सदस्यांना वीस लाखांचे पत्र मागविले जात असल्याची चर्चा सदस्यांमध्ये आहे. सर्व सदस्यांना वेगवेगळया निधीसाठी पत्र मागविले जात असल्याने सदस्यांना नेमका किती निधी मिळणार याबाबत सदस्यांकडून प्रश्न उपस्थित होऊ लागले आहे.बांधकाम विभागाचे नियोजन अंतिम झाले. मात्र, आयपॉसवर निधी पडलेला नाही. त्यामुळे लघु पाटबंधारे विभागाचे नियोजन रखडले असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या