Wednesday, April 24, 2024
Homeजळगावजि.प.सदस्या पल्लवी सावकारेंना ‘कर्तव्यदक्ष’ पुरस्कार जाहीर

जि.प.सदस्या पल्लवी सावकारेंना ‘कर्तव्यदक्ष’ पुरस्कार जाहीर

जळगाव । jalgaon

जिल्हा परिषद पंचायत समिती असो.महाराष्ट्रतर्फे कुर्‍हे- वराडसिम गटाच्या जिल्हा परिषद सदस्या पल्लवी प्रमोद सावकारे (ZP member Pallavi Saavkare) यांना कर्तव्यदक्ष राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. नाशिक विभागातून या एकमेव महिला सदस्याचा समावेश आहे. या पुरस्काराचे वितरण येत्या 5 मार्च रोजी अण्णाभाऊ सभागृह एअरपोर्टरोड येरवडा पुणे (Pune) येथे प्रदान करण्यात येणार आहे.

- Advertisement -

खेड्यांचा विकास… तरचं महाराष्ट्र झकास हे ब्रिद घेऊन जिल्हा परिषद पंचायत समिती असो.महाराष्ट्र ही संघटना राज्यभर कार्यरत असून गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेच्या सभागृहात ग्रामीण भागातील जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडून प्रभावीपणे तडीस नेले. पाच वर्षात आपल्या गटात चांगल्या प्रकारे कामे करण्यात यश आले. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या सदस्यांकडून जिल्हा परिषद पंचायत समिती असो.महाराष्ट्रतर्फे राज्यभरातून कार्यरत असणार्‍या जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांनाकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. पाच सदस्यीय निवड समितीने आलेल्या प्रस्तावांची छाननी करुन टॉपटेन पुरस्कार जाहीर केले आहे.

या निवड समितीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती असो.चे संस्थापक अध्यक्ष कैलास गोरे-पाटील, पुरस्कार निवड समिती अध्यक्ष शरद बुट्टे-पाटील, राज्य सरचिटणीस सुभाष घरत, प्रदेश कार्याध्यक्ष उदय बने, राज्य उपाध्यक्ष जयमंगल जाधव यांनी कुर्‍हे- वराडसिम गटाच्या जिल्हा परिषद सदस्या पल्लवी प्रमोद सावकारे यांना राज्यस्तरीय कर्तव्यदक्ष जि.प.सदस्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

निवड समिती अध्यक्ष शरद बुट्टे-पाटील व संस्थापक अध्यक्ष कैलास गोरे-पाटील यांच्या स्वाक्षरीचे पत्र 22 फेब्रवारी रोजी जि.प.सदस्य पल्लवी सावकारे यांना प्राप्त झाले आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती असो.चे यंदाचे पहिले वर्ष असून या पुरस्काराचे वितरण येत्या 5 मार्च रोजी अण्णाभाऊ सभागृह एअरपोर्टरोड येरवडा पुणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे, असे संस्थापक अध्यक्ष कैलास गोरे-पाटील यांनी ‘देशदूत’शी बोलतानां सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या