Monday, April 29, 2024
Homeनगरजि.प.सदस्या काकडे यांचे रस्त्यांबाबत सीईओंना निवेदन

जि.प.सदस्या काकडे यांचे रस्त्यांबाबत सीईओंना निवेदन

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

शेवगाव तालुक्यातील अमरापूर, पागोरी पिंपळगाव ,सुलतानपूर बु. येथील संतप्त ग्रामस्थांचे व शालेय विद्यार्थी यांनी जि.प. सदस्या हर्षदा काकडे यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आशिष येरेकर यांना निवेदन देत रोष व्यक्त केला.

- Advertisement -

यावेळी राजेंद्र पोटफोडे, अशोक ढाकणे, राम पोटफोडे, बबन गायकवाड, चांगदेव भुकन, बाबासाहेब पठाडे, अंबादास म्हस्के, दत्तू भुजबळ, अकबर शेख आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, शेवगाव तालुक्यातील खराब असलेले रस्ते इतर शहर व गावांना जोडणारे आहे. खराब असलेल्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. सर्व शेतकर्यांना शेतीमध्ये जाण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना शाळेमध्ये ये-जा करण्यासाठी सदरील रस्ते अत्यंत गरजेचे आहे.

अमरापूर ते पागोरी पिंपळगाव, अमरापूर ते सुलतानपूर हे दोन रस्ते शेवगाव, पाथर्डी, अहमदनगर शहराला जोडणार आहेत. रस्ता खराब असल्याने अनेक लहान-मोठे अपघात घडत आहे. त्यामुळे या रस्त्याचे भरावीकरण व डांबरीकरण होण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.तसेच मौजे अंतरवाली खुर्द ते चापडगाव रस्ता, मौजे शिंगोरी ते राणेगाव रस्ता, मौजे मंगरूळ ते चापडगाव रस्ता, मौजे गदेवाडी फाटा ते सोनेसांगवी ते वरखेड रस्ता, मौजे मंगरूळ ते चापडगाव रस्ता, मौजे मालेगावने ते बाभळगाव फाटा (गेवराई रोड) हे रस्ते शहराला जोडणारे असल्याने या रस्त्यावर फक्त खडीकरण झालेले आहे.

तर काही रस्त्यांवर खडीकरण देखील झालेले नाही. या रस्त्याचे सर्वेक्षण करून लवकरात लवकर त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्याची मागणी शेवगाव तालुक्यातील शेतकर्‍यांच्यावतीने करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या