Saturday, April 27, 2024
Homeनगरदीड वर्षापासून झेडपीची लिप्ट बंदच

दीड वर्षापासून झेडपीची लिप्ट बंदच

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गेल्या दीड वर्षांपासून मुख्यालयाची लिप्ट बंद (ZP Head Office elevator closed) आहे. त्यामुळे अनेक लोकांचे हाल होत असून वयस्कर व अपंग लोक कामानिमित्त येत असतात लिप्ट बंद (elevator closed) असल्यामुळे तिसर्‍या अथवा चौथ्या मजला जातांना अतोनात हाल सहन करावे, लागत आहे. यामुळे काहींनी जिल्हा परिषदेत (Zilla Parishad) येणेच बंद केले आहे.

- Advertisement -

जिल्ह्याचा एवढा मोठा कारभार पाहणारी जिल्हा परिषद (Zilla Parishad) ही संस्था आहे. मात्र, दीड वर्षात साधी लिप्ट दुरुस्त करू शकत नाही. आर्थिक हितसंबंध असणारे टेंडर (Tender), गाड्या विशेष बाब म्हणुन त्वरीत मंजूर होतात. मग लिप्ट काम विशेष बाब म्हणून का होत नाही, असा प्रश्‍न जिल्ह्यातील पडलेला आहे. जिल्ह्यात अनेक पंचायत समितींना सहा ते सात कोटी रुपयांच्या इमारती बांधल्या. मात्र, तेथील वीज कनेक्शन कट (Power connection cut) असून त्यामुळे संगणक बंद (Computer Close) आहेत. साफसफाईचे टेंडर संपले म्हणून साप सफाई बंद असून त्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे.

अधिकार्‍यांना या बाबत विचारणा केली असता त्याला तरतूद नाही असे सांगतात मग कोट्यवधी रुपयांच्या इमारती बांधल्या कशाला ? असा प्रश्‍न आहे. अधिकारी-पदाधिकारी यांनी या विषयाकडे त्वरीत लक्ष देणे गरजेचे आहे नाही अन्यथा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करावे लागेल असा इशारा भाजप गटनेते जालिंदर वाकचौरे आणि सदस्य सोमनाथ पचारणे यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या