Sunday, April 28, 2024
Homeनाशिकजि.प.कर्मचारी पतसंस्था : नवनिर्वाचित संचालकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

जि.प.कर्मचारी पतसंस्था : नवनिर्वाचित संचालकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा पगारदार कर्मचारी पतसंस्थेच्या( Z.P. Employees’ Credit Society) नवनिर्वाचित संचालकांचा सन्मान सोहळा आणि सहकार परिषद रविवारी (दि. २०) सकाळी ११ वा. होत आहे. दिंडोरी रोडवरील म्हसरूळमधील इसार पेट्रोल पंपाजवळील अभिषेक प्लाझामध्ये हा कार्यक्रम होणार आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी हरिभाऊ वाकचौरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार डॉ.राहुल रनाळकर असतील.

- Advertisement -

नाशिक जिल्हा परिषद,नाशिक जिल्हा रुग्णालय,नाशिक जिल्हा न्यायालयीन ,औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नाशिक जिल्हा पशुसंवर्धन, नाशिक जिल्हा हिवताप, नाशिक जिल्हा आदिवासी विकास विभाग कर्मचारी या सहकारी पतसंस्थांच्या नवनिर्वाचित संचालकांचा सन्मान यावेळी केला जाणार आहे. जिल्हा सेवानिवृत्त सेवा असोसिएशनचे अध्यक्ष उत्तमराव गांगुर्डे, उपाध्यक्ष रवींद्र थेटे, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे विभागीय सचिव दिलीप थेटे, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरुण आहेर, आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय सोपे, न्यायालयीन कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दादाभाऊ निकम यांनी ही माहिती दिली.

कार्यक्रमासाठी राज्य सरकारी गट ‘ड’ चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कासार, नाशिक जिल्हा परिषद परिचर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास शिंदे, पशुवैद्यकीय व्यावसायिक कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान पाटील, जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे कार्याध्यक्ष रावसाहेब पाटील, जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद निरगुडे, उपाध्यक्ष किरण निकम, मार्गदर्शक रवींद्र आंधळे, जिल्हा परिषद स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव भोये, राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे कार्याध्यक्ष उदय लोखंडे, शासकीय निमशासकीय लिपिक संवर्गीय हक्क परिषदेचे जिल्हाध्यक्ष नीलेश देशमुख हे कार्यक्रमाचे संयोजक आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या