Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशZomato IPO : झोमॅटोचा आयपीओ आला!, जाणून घ्या झोमॅटोची कुंडली

Zomato IPO : झोमॅटोचा आयपीओ आला!, जाणून घ्या झोमॅटोची कुंडली

दिल्ली | Delhi

गेले काही महिने खूप चर्चेत असणारा ‘झोमॅटो’चा ‘बिगबँग आयपीओ’ (Zomato IPO) बाजारपेठेत आला आहे.

- Advertisement -

या आयपीओमध्ये ९००० कोटी रुपयांचे शेअर्स जारी करण्यात येणार आहे. यासोबतच इन्फो एज ३७५ कोटी रुपयांचे शेअर्सची विक्री करणार आहे. रिटेल गुंतवणूकदारांसाठी १० टक्के म्हणजेच ९३३ कोटी रुपयांचा हिस्सा राखीव असणार आहे.

रिटेल गुंतवणूकदार जास्तीत जास्त १३ लॉटसाठी बोली लावू शकता. यामध्ये जस्तीत जास्त १.९४ लाख रुपये गुंतवू शकता. या आयपीओची सर्वात विशेष बाब म्हणजे ६५ लाख शेअर्स कर्माचाऱ्यांसाठी राखीव आहेत.

झोमॅटोच्या उत्पादनात आर्थिक वर्ष २०२० मध्ये ९६ टक्क्यांनी वाढ झाली होती. कंपनीचा महसूल २०१९ मध्ये १ हजार ३९८ कोटीवरून २०२० या आर्थिक वर्षात २ हजार ७४३ कोटी रुपये झाला होता. पण कोरोना संकटामुळे यंदाच्या आर्थिक वर्षात झोमॅटोच्या उत्पादनात घट झाली.

आर्थिक वर्षे २०२१ च्या पहिल्या तिमाहीत झोमॅटोने १ हजार ३६७ कोटींचा महसूल जमा केला. तर कंपनीचा खर्च जवळपास १,७२४ कोटी रुपये एवढा होता. त्यामुळे कंपनीला ६८४ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. पण असे असले तरी या कंपनीचे भविष्य उज्ज्वल असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पब्लिक कंपनीत झोमॅटो कंपनीचे रुपांतरण झाले आहे. त्याचबरोबर मेमोरॅन्डम ऑफ असोसिएशनमध्ये बदल केला आहे. येत्या काळात अॅपवरून होणारी वाढती मागणी पाहता कंपनीचा व्यवसाय वाढत जाईल, असे जाणकारांचं म्हणणे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या