Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशZomato IPO Share Listing : शेअर बाजारात 'झोमॅटो' तेजीत

Zomato IPO Share Listing : शेअर बाजारात ‘झोमॅटो’ तेजीत

मुंबई | Mumbai

फूड डिलिव्हरी क्षेत्रात असलेल्या Zomato ने नुकतेच आपले IPO आणले होते. Zomato ने पदार्पणातच दमदार कामगिरी केली आहे. आज शेअर बाजार (Stock Market) सुरु झाला तेव्ह Zomato ने जबरदस्त कामगिरी करत सुरुवात केली.

- Advertisement -

ज्यावेळी शेअर बाजारात Zomato च्या शेअरची नोंदणी झाली, त्यावेळी एका शेअरचा भाव ११५ रुपये इतका झाला. मूळ IPO च्या वेळी हा भाव ७६ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला होता, त्यात तब्बल ५१ टक्क्यांची वाढ शेअर बाजारात शुक्रवारी पदार्पण होताच झाली.

तर, काही वेळातच गुंतवणूकदारांनी या शेअरच्या खरेदीसाठी झुंबड केली आणि शेअरचा भाव मूळ किमतीच्या तब्बल ८२ टक्क्यांनी वधारत प्रति शेअर १३९ रुपयांपर्यंत पोचला. बाजारातील भांडवली मूल्याचा विचार केला तर Zomato नं एक लाख कोटी रुपयांचा पल्ला पदार्पणाच्या दिवशीच पहिल्या काही तासांतच गाठला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या