Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedइकोफ्रेंडली बाईक्सवर 'झोमॅटो' पोहोचवणार पार्सल

इकोफ्रेंडली बाईक्सवर ‘झोमॅटो’ पोहोचवणार पार्सल

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

झोमॅटोने सर्व फूड डिलिव्हरी करणारी वाहने आता इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रुपांतरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. 2030 पूर्वीच कंपनीमध्ये फूड डिलीव्हरी आणि इतर सर्व वाहने इलेक्ट्रिक होणार आहेत. कंपनीचे को-फाउंडर दीपेंदर गोयल यांनी दिल्ली, मुंबई, बेंगळुरू सारख्या शहरांत कंपनी आधीपासूनच इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करत असल्याचे सांगितले…

- Advertisement -

झोमॅटो कंपनी ‘EV100 ग्लोबल इनिशिएटिव्ह’ मोहीम जॉईन करणार आहे. कंपन्या आपल्या सर्व फ्लिट इलेक्ट्रिक वाहनांमध्येमध्ये स्विच करण्याची ही जागतिक मोहीम आहे. या मोहिमेंतर्गत आमच्या 100 टक्के फ्लिट 2030 पर्यंत पूर्णपणे इलेक्ट्रिक होतील. दीपेंदर गोयल यांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे.

आमच्याकडे EVs सोर्स करण्यासाठी अनेक पार्टनर्स आहेत, असंही ते म्हणाले. फ्लिपकार्टदेखील EV100 ग्लोबल इनिशिएटिव्हचा एक भाग आहे. इलेक्ट्रिक व्हेईकल सेक्टरमध्ये झोमॅटो कंपनी अनेकांशी चर्चा करीत आहे.

याचे पायलट डिझाईन करण्यासह बिजनेस मॉडेल क्रिएट केले जाणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांशिवाय झोमॅटो यावर्षी आपला आयपीओ लाँच करणार आहे. यासाठी कंपनीने एसईबीआयकडे अर्जदेखील केला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या