Thursday, April 25, 2024
Homeनगरखूशखबर...! जिल्हा परिषदेच्या 950 हून अधिक जागांसाठी लवकरच भरती

खूशखबर…! जिल्हा परिषदेच्या 950 हून अधिक जागांसाठी लवकरच भरती

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

2023 हे वर्षे जिल्ह्यातील बेरोजगारांठी (Unemployed) खूशखबर घेवून आले आहे. जिल्हा परिषदेत (Zilla Parishad) 2019 पासून रखडलेल्या रिक्त पदाच्या भरतीला (Recruitment) यंदाचा मुहूर्त लाभणार आहे. विभागीय महसूल आयुक्त (Divisional Revenue Commissioner) कार्यालयाने 950 हून अधिक झेडपीच्या सर्व विभागाच्या रिक्त पदांच्या रोष्टरला मागील आठवड्यात मान्यता दिली आहे. जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) वरिष्ठ अधिकार्‍यांनी याला दुजोरा दिला असून या महिन्यांच्या अखेरला अथवा पुढील महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या भरतीची (Zilla Parishad Recruitment) जाहीर प्रसिध्द होणार आहे.

- Advertisement -

कोपरगाव तहसीलदारांची महसूलमार्फत स्वतंत्र चौकशी

नगरसह राज्यातील जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) रिक्त पदाची भरती रखडली होती. 2019 मध्ये राज्यात कोविड महामारीच्या संसर्ग झाल्याने राज्य सरकारने सर्व विभागाच्या भरतीवर निर्बंध आणले होते. कोविड काळात आरोग्य विभागाला (Health Department ) प्राधान्य दिल्याने नगरसह राज्यातील जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांच्या भरतीवर बंदी आणण्यात आली होती. मात्र, आता कोविड जवळपास संपला असून विविध अडचणीवर मात करत जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांच्या भरतीचा मार्ग मोकळा होतांना दिसत आहे. मागील आठवड्यात जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या (General Administration Department) मार्गदर्शनाखाली सर्व विभागांनी पेसासह (आदिवासी भागानूसार) रिक्त जागांचे रोष्टर (बिंदूनामावली) विभागीय महसूल आयुक्त कार्यालयाकडून तपासून आणली आहे.

30 सप्टेंबरनंतर दोन हजारांच्या नोटा दानपेटीत टाकू नका

यानूसार जिल्हा परिषदेच्या 986 च्या जवळपास जागा रिक्त दिसत होत्या. मात्र, राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने 2019 च्या नोटिफीकेशननूसार कनिष्ठ सहायकांच्या जागांमध्ये वाढ करण्याची सुचना केल्यामुळे रिक्त जागांचा तपाशीलात काही प्रमाणात वाढ अथवा घट होण्याची शक्यता आहे. मात्र, तरीही जिल्हा परिषेद सर्व विभाग मिळून 950 हून अधिक जागा रिक्त होणार असून या जागांसाठी लवकरच भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. यामुळे सरकारी नोकरीच्या प्रतिक्षेत असणार्‍यांंना संधी निर्माण होणार आहे.

नदी पात्राची मूळ रुंदी, नदीची हद्द निश्चित करण्याचे काम मनपाचे

या भरतीसाठी राज्य पातळीवरून प्रक्रिया जाहीर करण्यात येणार असून ग्रामविकास विभागाने भरती प्रक्रिया राबवण्यासाठी राज्य पातळीवर खासगी कंपनीची नेमणूक केलेली आहे. संबंधीत कंपनी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असणार्‍या जिल्हा निवड मंडळाच्या मार्फत प्रक्रिया पूर्ण करणार आहे. या भरती प्रक्रियेवर विभागीय महसूल आयुक्त यांचे नियंत्रण राहणार आहे. या महिन्यांच्या अखेरीस अथवा पुढील महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात भरतीसाठी जाहीरात प्रसिध्द होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) सुत्रांच्यावतीने देण्यात आली.

अवकाळीमुळे एप्रिल महिन्यात 47 कोटींचा फटका

- Advertisment -

ताज्या बातम्या