Wednesday, April 24, 2024
Homeनगरजिल्हा परिषदेची शुक्रवारी बजेटची सभा

जिल्हा परिषदेची शुक्रवारी बजेटची सभा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषदेची विद्यमान सदस्य मंडळ आणि पदाधिकार्‍यांची शुक्रवार (दि.25) तारखेला अर्थसंकल्पीय सभा होणार आहे. ही सभा विद्यमान पदाधिकार्‍यांची शेवटची सभा असून या सभेत विविध विभागाच्या निधी वाटपावरून खडाजंगी होणार आहे. ऑनलाईन होणार्‍या या सभेला काही सदस्य हे जिल्हा परिषदेत येवून प्रत्यक्षात सभेला हजेरी लावणार आहेत.

- Advertisement -

जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवार जिल्हा परिषदेची अखेरची सभा होणार आहे. 20 मार्चला विद्यमान पदाधिकारी आणि सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे. यामुळे शुक्रवारची सभा ही अखेर होणार असून यात सत्ताधार्‍यांविरोधात विरोधक आक्रमक होत काय पाऊल उचलणार याकडे जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे.

गेल्या काही महिन्यांत अंगणवाडी खोल्या, शाळा खोल्या, 15 वित्त आयोगाच्या निधीवरून पदाधिकारी आणि काही ठराविक सदस्यांमध्ये वितूष्टता आलेली आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील एक गट विकास कामे वाटपावरून नाराज आहे. आमच्या वाट्याला काय दिले असा सूर ते पदाधिकार्‍यांना विचारत आहेत. करोनामुळे आधी जिल्हा परिषदेच्या निधीवर बंधने आलेली असून गेल्या काही महिन्यांत करोना प्रादूर्भाव कमी झाल्यानंतर काही प्रमाणात राज्य सरकारकडून निधी आला मात्र त्यात सदस्यांना डावल्याने ते सध्या संतप्त आहेत. याचे जोरदार पडसाद या सभेत उमटण्याची चिन्हे आहेत. यामुळे पदाधिकारी या सभे पूर्वी नाराजांची नाराजी कशी दूर करणार हे पाहवे लागणार आहे. दुसरीकडे प्रशासनातील बडे अधिकारी देखील नाराज असून अवास्तव मागण्यामुळे अधिकारी देखील त्रस्त असल्याचे दिसत आहेत. यामुळे शुक्रवारी होणार्‍या सभेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे.

त्यात यंदा जिल्हा परिषदेच्या बजेटला दहा कोटींच्या जवळपस कात्री लागणार असून ऐन निवडणुकीच्या तोंडावर पदाधिकारी आणि सदस्यांसाठी हा धक्का राहणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी गट आणि गणांची रचना बदलणार असून आरक्षण अद्याप जाहीर झालेेले नाही. यामुळे विद्यमानपैकी किती सदस्यांना पुन्हा जिल्हा परिषदेत याला संधी मिळणार हे निश्चित नाही. यामुळे शेवटच्या सभेत सदस्य कोणती भूमिका घेणार हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.

बजेटसह 24 विषय मंजूरीला

शुक्रवारी होणार्‍या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषदेच्या 2022-23 चे बजेट सादर होणार आहे. यासह 2021-22 च्या सुधारित आणि 2022-23 च्या मूळ अंदाजपत्रक सभेसमोर मंजूरीसाठी ठेवण्यात येणार आहे. यासह अन्य 24 विषय मंजूरीसाठी ठेवण्यात आलेले असून अनेक तालुक्यातील रस्ते हे जिल्हा परिषदेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत करण्याचा विषय ठेवण्यात आलेला आहे.

रोजगार हमीच्या 2022-23 च्या लेबर बजेटचा विषय या सभेत मान्यतेसाठी ठेवण्यात आलेला आहे. शेतकर्‍यांसाठी जिल्हा परिषद सेस फंडातून 50 टक्के अर्थसहायेतून कडबाकुट्टी मशीन योजन राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी 52 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून ही योजना प्रशासकीय मान्यतेसाठी सभेपुढे ठेवण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या