Thursday, April 25, 2024
Homeनाशिकवडाळागावातील समस्या सोडविण्यासाठी युवाशक्तीचे महापालिका आयुक्तांना निवेदन

वडाळागावातील समस्या सोडविण्यासाठी युवाशक्तीचे महापालिका आयुक्तांना निवेदन

नाशिक । Nashik

सर्व प्रकारचे कर भरून देखील महापालिका (municipal) हद्दीतील वडाळागाव परिसर (Wadalagaon area) विविध सुविधांपासून वंचित (Deprived of facilities) आहे. त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून परिसरातील समस्यांची त्वरित सोडवणूक व्हावी,अशी मागणी युवाशक्ती कामगार संघटनेच्या (Yuvashakti Kamgar Sanghatana) वतीने महापालिका आयुक्तांना (Municipal Commissioner) निवेदन देऊन करण्यात आली आहे. मागण्यांचा विचार होऊन काम न झाल्यास आंदोलनाचा (agitation) इशारा देखील देण्यात आला आहे…

- Advertisement -

वडाळगावातील मदिनानगर (Madinanagar) येथील मदिना मस्जिदकडे (Medina Mosque) जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली असून रस्त्याचे काँक्रीटकरण (Concreting road) करण्यात यावे. तसेच परिसराचा हा मुख्य मार्ग असल्याने या ठिकाणी सतत पायी चालणाऱ्यांची व वाहनांची गर्दी असते. यामुळे या रस्त्याची दुरावास्थ झाल्याने या रस्त्यावरून पायी चालणे कठीण झाले आहे. याबाबत नाशिक महानगरपालिकेला वेळोवेळी निवेदन देऊनही या रस्त्याची दुरावस्था संपत नसल्याने व अधिकारीवर्ग या मागणीकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याने या भागातील नागरिकांमध्ये नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik Municipal Corporation) कामकाजाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

त्याचप्रमाणे वडाळगाव परिसरातील सादिकनगर, कादरीनगर येथे पाणीपुरवठ्याची पाईपलाईन नसल्याने येथील रहिवाश्यांना दुसऱ्या भागात जाऊन पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. या भागात नाशिक महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने अद्याप पाण्याची पाईपलाईन न टाकल्यामुळे येथील नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या