Thursday, April 25, 2024
HomeजळगावYuvarang Youth Festival # दुसरा दिवस ठरला तरूणाईच्या जल्लोषाचा दिवस

Yuvarang Youth Festival # दुसरा दिवस ठरला तरूणाईच्या जल्लोषाचा दिवस

जळगाव jalgaon

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ( Poet Bahinabai Chaudhary North Maharashtra University) विद्यार्थी विकास विभाग आणि तापी परिसर विद्या मंडळाचे धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवारंग युवक महोत्सवात (Yuvarang Youth Festival) आजचा दिवस तरूणाईच्या जल्लोषाचा (youthful exuberance) दिवस ठरला. आज तरूणाईने अनेक नवनवीन विषय अनुभवले.  

- Advertisement -

 आज सकाळपासूनच युवारंगच्या प्रत्येक रंगमंचावर तरूणाईचा उत्साह ओसंडून वाहताना दिसून येत होता. रंगमंच क्र.1 कै. सुनीतभाई बोंडे रंगमंचावर शेतीवर आलेले उत्पन्न कवडीमोल किमतीने विक्री करून सावकाराचे कर्ज फेडत येणारी अडचण व त्यातूनच केलेली आत्महत्या हा ह्रदयाला भेदून जाणारा क्षण अंगाला शहारे आणण्यासारखा होता. राष्ट्रीय एकात्मतेतून दिले जाणारे विविध संदेश यातून प्रत्येक प्रेक्षक मनापासून दाद देत होता. तसेच सोशल मिडीया एक वेडं या मुकनाट्यद्वारे तरूणाईने किती आहारी जावे हे विचार करणारे सादरीकरण मनाला भावून जाणारे होते. याशिवाय पर्यावरणाचा ऱ्हास याद्वारे होणारे नुकसान तसेच झांसीची राणी यांनी रणांगणावर केलेल्या कर्तबगारीचे सादरीकरण दाद देणारे होते. ग्रामीण जनजीवन व तेथील समस्या याद्वारे खेडेगावातील समस्यांपासून होणारा त्रास हे जीवंत दृश्य खुप काही सांगून गेले. अतुल्य भारत,महिला सक्षमीकरण, स्‍त्री शक्ती, सेव्ह द बर्डस, रस्ता सुरक्षा, कोरोना वॉरियर्स यासह अनेक विषय या रंगमंचावर हाताळण्यात आलेत.या कलाप्रकारात एकुण 29 महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला.

रंगमंच क्र.2 कै.व्ही.डी.फिरके रंगमंचवर पाश्चिमात्य गायन कलाप्रकारात वेस्टर्न मुव्ही साँगसह अनेक वेस्टर्न गायन प्रकार सादर करण्यात आलेत, पाश्चिमात्य गाणी सादर करून कलावंतानी अत्यंत बहारदारपणे सादर केली, कोरस या कलाप्रकारात सुरेल पाश्चिमात्य गीतांना प्रेक्षकांनी उचलून धरले. यात गिटार,सिंथेटाईझर व क्लॅप बॉक्स हे वाद्य या कलाप्रकाराचे वैशिष्टे ठरले. या कलाप्रकारात एकुण 11 महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला.

Yuvarang Youth Festival # महाराष्टाची हास्य जत्रा फेम ओकांर भोजनेंने फैजपूरात दिला तरूणाईला हा सल्ला…

रंगमंच क्रं.3 कै.घनश्याम काशीराम पाटील रंगमंच वर वादविवाद या कलाप्रकारात भारतीय राज्यघटना सध्याची परिस्थितीत सुव्यवस्थित आहे हा मुख्य विषय ठेवण्यात आला होता. यात महिला स्वातंत्र , भारतीय राज्यघटना, जातीवाद याशिवाय अनेक विषय हाताळून अनुकुल व प्रतिकुल या विषयावर दोन्ही स्पर्धकांकडून बाजू मांडण्यात येत होती तसेच जोरदार युक्तीवाद येथे होताना दिसून येत होता. प्रेक्षकांकडून अतिशय चांगल्याप्रकारे दाद या कलाप्रकारास मिळताना दिसून येत होती.  या कलाप्रकारात एकुण 61 महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला.

रंगमंच क्र.4 कै.वजीर चांदखा तडवी रंगमंच वर भारतीय सुगम संगीत या कलाप्रकारात गझल, भजन, अभंग, गैरचित्रपट गीते कलाप्रकारात स्पर्धकांनी प्रेक्षकांची मने जिंकत अतिशय दाद मिळविला. यात प्रामुख्याने सुनोना साजन तुम्हारे रूप की छाया मे साजन  तसेच देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देव्हाऱ्यात या गाण्यांनी प्रेक्षकांना अतिशय भुरळच घातली.  या कलाप्रकारात एकुण 31 महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला.

रंगमंच क्र.5 कै.बाजीराव नाना पाटील रंगमंच येथे चिकटकला (कोलाज), या कलाप्रकारात व्यक्तिचित्र व निसर्गचित्र हे विषय देण्यात आले यातून अनेक विषय हाताळण्यात आले. मातीकला(क्ले मॉडेलिंग) मुखवटा, प्राणी व घसरगुंडी हे विषय देण्यात आले. यात स्पर्धकांनी अक्षरश: जीवंतपणा निर्माण केला.यात प्रत्येकी 32 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.

विद्यापीठस्तरीय युवारंग युवक महोत्सवात आज 11 फेब्रुवारी रोजी दुपार सत्रात रंगमंच क्र.1 कै. सुनीतभाई बोंडे रंगमंचावर युवकांनी आपल्या अंगी असलेल्या विविध गुणांचे प्रकटीकरण केले. स्पर्धक युवकांच्या कलाविष्काराने उपस्थिताना अवाक होण्याशिवाय पर्याय नव्हता, प्रचंड दाद मिळवत रंगमंच 1 वर मिमिक्री या कलाप्रकारात पक्ष्यांचा आवाज, कार्टुनचा आवाज, आशा भोसले, सलमा आगा, मंजुलिका,सुनिधी चव्हाण,यासह अनेक गायकांचा आवाज काढत प्रत्यक्ष चित्रपट गृहात असल्याचा प्रत्यय आणला. अमरिश पुरी, परेश रावल, नाना पाटेकर, सनीदेओल, ऋतिक रोशन, निळू फुले, गुलशन ग्रोवर,ओमप्रकाश हे सिनेअभिनेता जणू प्रत्यक्ष रंगमंचावर आपली कला सादर करीत असल्याचा आनंद आज प्रेक्षकांनी अनुभवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवराज चव्हाण, मोटू-पतलू, राहूल गांधी यांचा हुबेहुब आवाजाने प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. एस.टीतील प्रवास,स्वच्छ व सुंदर भारत अभियान आदी विषय या रंगमंचावर मिमिक्रीच्या माध्यमातून हाताळले गेले. एकुण 10 महाविद्यालयांनी या कलाप्रकारात सहभाग नोंदविला.

रंगमंच क्र.2 कै.व्ही.डी.फिरके रंगमंचवर पाश्चिमात्य गायन व वाद्यसंगीत या कलाप्रकार सर्वच स्पर्धकांनी अत्यंत बहारदारपणे सादर केले. कोरस या कला प्रकारातील सुरेल पाश्मिमात्य गीतांना प्रेक्षकांनी उचलून धरले, गिटार, व्हायोलिन, पियानो आदी संगीत साधनांचा आविष्कार सादर करून प्रेक्षकांमधून दाद मिळवली. यात पाच महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला.

रंगमंच क्रं.3 कै.घनश्याम काशीराम पाटील रंगमंच वर स्पॉट फोटोग्राफी साठी सुंदरता आणि शॅडो लाईट हे दोन विषय स्पर्धक विद्यार्थ्यांना देण्यात आला. यात 51 स्पर्धक सहभागी झाले होते.

रंगमंच क्र.4 कै.वजीर चांदखा तडवी रंगमंच वरभारतीय शास्‍त्रीय गायन या कलाप्रकारात तु ही तेरो नाम या गीताने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले भालकंस, मुलतानी, हिमपलास, बागेश्रीयमन, भैरव, उरधनश्री, शुध्दकल्याण या घराण्यांच्या गायन प्रकारातील कलेचे सादरीकरण केले. या कलाप्रकारात एकुण 10 स्पर्धक सहभागी झाले होते. शास्‍त्रीय गायन ऐकण्यासाठी रसिकांची रंगमंचासमोर गर्दी झाली. स्पर्धकांच्या सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली.

रंगमंच क्र.5 कै.बाजीराव नाना पाटील रंगमंच येथे इन्स्टालेशन या कलाप्रकारात महिला सक्षमीकरण, ग्रामीण जनजीवन,शेतकरी आत्महत्या, आजादी का अमृत महोत्सव, पर्यावरण,देशातील समस्या(महागाई, भ्रष्टाचार, दारिद्रय), मानवी विकास, डिजीटल व्हिलेज, ध्यान-अध्यात्म,शेततळे, पाणीवाचवा आदी विषयांवर स्पर्धक विद्यार्थ्यांनी प्रकाश टाकला,

            युवारंग युवक महोत्सवात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी प्रेक्षक व परीक्षकांकडून कलाविष्काराचे कौतुक करण्यात येत आहे. तसेच फैजपूर येथील युवारंग युवक महोत्सवात सहभागी स्पर्धक विद्यार्थ्यांमध्ये चुरस निर्माण झाल्याने युवारंग युवक महोत्सव हा महत्वपूर्ण ठरत असल्याचे चित्र महाविद्यालयाच्या प्रांगणात दिसून येत आहे.

उद्या दिनांक 12.02.2023 रोजी युवारंग महोत्सवात पुढील प्रमाणे सादरी करण होणार आहे. रंगमंच क्र.1 कै. सुनीतभाई बोंडे रंगमंचावर भारतीय लोक समुह नृत्य, रंगमंच क्र.2 कै.व्ही.डी.फिरके रंगमंचवर भारतीय शास्‍त्रीय नृत्य, भारतीय लोकसंगीत वाद्यवृंद, रंगमंच क्रं.3 कै.घनश्याम काशीराम पाटील रंगमंच वर स्पॉट फोटोग्राफी अंतीम फेरी,रंगमंच क्र.4 कै.वजीर चांदखा तडवी रंगमंच वर नाटय संगीत, मेहंदी व रंगमंच क्र.5 कै.बाजीराव नाना पाटील रंगमंच वर पोस्टर मेकिंग व रांगोळी हे कला प्रकार सादर करण्यात येणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या