Tuesday, April 23, 2024
Homeनगरयुथ काँग्रेस-एनएसयूआयची आजपासून जिल्हावारी

युथ काँग्रेस-एनएसयूआयची आजपासून जिल्हावारी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

युवक काँग्रेस, एनएसयुआयच्या संघटनात्मक बांधणीसाठी काँग्रेस पक्षाने आता जिल्ह्यातील युवा नेत्यांना मैदानात उतरविले आहे.

- Advertisement -

काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष तथा युवक, एनएसयुआय जिल्हा समन्वयक यांच्यासोबत युवक काँग्रेसचे जिल्हा निरीक्षक अकीलभाई पटेल, जिल्हा कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटे, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष निखिल पापडेजा हे आजपासून जिल्हा दौरा करत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी बैठका घेणार आहेत.

याबाबत दिवटे आणि पापडेजा म्हणाले, प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या सूचनेवरून हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. काँग्रेस पक्षामध्ये युवकांना त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात संधी दिली जात आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी युवक व विद्यार्थ्यांना एकत्रित करत संघटनात्मक बांधणीसाठी मोट बांधण्याचे काम युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजात तांबे यांच्या नेतृत्वाखाली केले जाणार आहे.

या दौर्‍यानंतर तालुकास्तरावरील नियुक्त्या अंतिम केल्या जाणार असून वरिष्ठ नेत्यांच्या मान्यतेनंतर त्यांची घोषणा केली जाणार आहे. या दौर्‍यात आज अकोले, कोपरगाव, शिर्डी, राहाता, उद्या (दि.17) राहुरी, श्रीरामपूर, नगर तालुका, नगर शहर, दि.18 नेवासा, शेवगाव, पाथर्डी, कर्जत, जामखेड, 19 श्रीगोंदा, पारनेर, संगमनेर. आ. डॉ. सुधीर तांबे, आ. लहू कानडे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे यांनी झूम मीटिंग घेत युवक व विद्यार्थी संघटनेचा आढावा घेतला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या