Friday, April 26, 2024
Homeनगरचाकूचा धाक दाखवत तरुणाला लुटले

चाकूचा धाक दाखवत तरुणाला लुटले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

तिघांनी तरुणाला चाकूचा धाक दाखवून मारहाण करीत त्याच्या खिशातील रोख रक्कम व दुचाकी बळजबरीने घेऊन गेले आहेत. अशोक सावळा खाडे (वय 32 रा. खाडे वस्ती, पाटोदा, ता. जामखेड) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. नगर-पुणे रोडवर चास शिवारात रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ मंगळवारी रात्री 10 वाजता ही घटना घडली आहे.

- Advertisement -

खाडे यांनी बुधवारी सकाळी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तीन चोरट्यांविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री अशोक खाडे त्यांच्या दुचाकीवरून (एमएच 16 सीझेड 8260) नगर-पुणे रोडने शिरूर (जि. पुणे) येथे जात असताना त्यांना तिघांनी चास शिवारात रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ अडवले.

चाकूचा धाक दाखवून डोक्यात मारहाण केली. खिशातील चारशे रुपये व दुचाकी बळजबरीने काढून घेत पोबारा केला. खाडे यांनी नगर तालुका पोलिसांना घटनेची माहिती देत फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रणजित मारग करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या