युवकाची अज्ञात व्यक्तीकडून हत्या

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक | Nashik

मूळचा हिंगोली जिल्ह्यातील (Hingoli District) शिरसम मधील रहिवासी असलेला युवक त्याच्या बहिणीला नाशिकमधील भगूर परिसरात ( Bhagur Area) सासरी सोडण्यासाठी आला असता या युवकाला एका अज्ञात व्यक्तीने अमानुष मारहाण करत ठार (killed) मारल्याची घटना उघडकीस आली आहे…

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गणेश पंजाब पठाडे (Ganesh Punjab Pathade) असे मृत्यू (Death)झालेल्या युवकाचे नाव आहे. गणेश पठाडे हा त्याची बहीण प्रज्ञा कांबळे हिला सासरी सोडण्यासाठी आला होता. सकाळी नाश्ता करत असताना त्याच्या मोबाईलवर फोन आला आणि तो बोलत घराबाहेर पडला. मात्र उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. त्यानंतर संध्याकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास नाशिकमधील देवळाली कॅम्प-भगूर (Dewalali Camp-Bhagur) या रस्त्यावर (Road) एक युवक बेशुद्धावस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

दरम्यान, यानंतर पोलिसांनी (Police) तात्काळ घटनास्थळी जाऊन ह्या युवकास देवळाली छावणी रुग्णालय आणि नंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. तर पोलिसांनी गणेशच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *