Thursday, April 25, 2024
Homeनगरनेटकेवाडी येथील मद्यधुंद युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

नेटकेवाडी येथील मद्यधुंद युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

नेटकेवाडी येथे शनिवारी (दि.9) गावठी दारू सेवन करून पाण्यात उतरलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. हा गावठी दारूचाच बळी असल्याचा आरोप करून नेटकेवाडी येथे राजरोसपणे सुरू असलेली बेकायदेशीर गावठी दारू विक्री बंद करावी अशी मागणी संतप्त महिलांनी केली आहे.

- Advertisement -

भास्कर किसन दळवी असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. यामुळे संतप्त झालेल्या युवक व महिलांनी कर्जत येथील पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन दारू बंदीची मागणी केली. यावेळी युवक कार्यकर्ते राम दळवी, सुनील शेलार, अंबर भोसले, सौरभ धांडे, नितीन कदम, हनुमंत नेटके, कृष्णा कवडे, सोमनाथ धांडे, अमर दळवी, दत्ता गोलांडे ,गोकुळ नेटके व ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या