Saturday, May 11, 2024
Homeनगरकेंद्र सरकारच्या सोयापेंड आयातीच्या निर्णयामुळे शेतकर्‍यांचे नुकसान : निर्मळ

केंद्र सरकारच्या सोयापेंड आयातीच्या निर्णयामुळे शेतकर्‍यांचे नुकसान : निर्मळ

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

केंद्र सरकारने (Central Government) जीएम सोयापेंड आयात (GM Soya Pend Import) करण्याचा घेतलेला निर्णय शेतकर्‍यांचे नुकसान (Losses of Farmers) करणारा आहे. यामुळे तोंडावर आलेल्या सोयाबीनचे भाव पडणार असून शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसणार आहे. केंद्राचा (Central Government) हा निर्णय शेतकर्‍यांना आर्थिक संकटात टाकणारा असल्याचे म्हणत राहाता (Rahata) तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र निर्मळ (Youth Congress President Rajendra Nirmal) यांनी निषेध (Protested) व्यक्त केला.

- Advertisement -

यंदा सोयाबीनला (Soybeans) चांगले भाव आहेत. मध्यतरी सात ते आठ हजार रुपये प्रतिक्विंटल दर गेल्याने सोयाबीन उत्पादकांना चांगल्या दराची अपेक्षा निर्माण झाली होती. बियाणे, मजुरीसह पेट्रोल डिझेलचे वाढलेले दर यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. यामुळे शासनाने दिलेल्या हमीभावात शेतकर्‍यांना शिल्लक राहत नाही. काहीवेळा तोटाही होतो. मात्र केंद्राने सोयापेंडीच्या आयातीचा निर्णय घेतल्यामुळे सोयाबीनच्या दरात मोठी घसरण होण्याची भीती शेतकर्‍यांमधून व्यक्त होत आहे.

महिनाभरात आपल्याकडील सोयाबीन काढणीला येणार असल्याने भाव पडल्यावर शेतकर्‍यांना मोठा फटका बसणार आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या सोयाबीन आयातीच्या निर्णयाचा राहाता तालुका युवक काँग्रेसच्यावतीने निषेध करण्यात येत असल्याचे राहाता तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र निर्मळ (Youth Congress President Rajendra Nirmal) यांनी प्रसिध्दीपत्रक काढून जाहीर केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या