Thursday, April 25, 2024
Homeधुळेयुवक काँग्रेसमधून कार्यकर्ता घडतो -आ.कुणाल पाटील

युवक काँग्रेसमधून कार्यकर्ता घडतो -आ.कुणाल पाटील

धुळे । Dhule प्रतिनिधी

युवक काँग्रेसही (Youth Congress) स्वतंत्र विचारसरणी असून कार्यकर्ता आणि नेता (Activists and leaders) घडविण्याचे काम खर्‍या अर्थाने युवक काँग्रेस करीत असते असे प्रतिपादन आ.कुणाल पाटील (MLA Kunal Patil) यांनी केले.

- Advertisement -

नुकत्याच घोषीत झालेल्या महाराष्ट्र व जिल्हा युवक काँग्रेसच्या निवडणुकीत (election) विजयी झालेल्या नवनियुक्त पदाधिकार्‍यांचा आ.कुणाल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. माजी मंत्री रोहिदास पाटील (Former Minister Rohidas Patil) यांच्या प्रमुख उपस्थितीत धुळ्यात युवक काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला.

पुढे बोलतांना आ.कुणाल पाटील (MLA Kunal Patil) म्हणाले की, प्रत्येकाची राजकिय कारकिर्द ही युवक काँग्रेसपासून (Youth Congress) सुरु होते.त्यामुळे युवक काँग्रेस कार्यकर्ता आणि नेता घडविण्याचे काम करीत असते. दवाखाना, पोलिस स्टेशन, कृषी कार्यालय, तहसिल, जिल्हाधिकारी, जि.प., पं.स. कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य व गोरगरीब जनतेची कामे करावीत. युवक काँग्रेस (Youth Congress) हा पाया आहे त्यामुळे पाया मजबुत असले तरच इमारत मजबुत होवू शकते, राजकारणात वेळ बदलायला वेळ लागत नाही म्हणून येणार्‍या 2024 च्या विधानसभा निवडणूकीत जिल्हयातून चार काँग्रेसचे आमदार निवडून येतील असा विश्वास व्यक्त करीत पक्षावर निष्ठा (Loyalty to the party) ठेवून काम करा सर्वसामान्य माणूस आपल्या सोबत राहील असे आवाहन आ.कुणाल पाटील यांनी केले.

धुळे शहर काँग्रेसचे अध्यक्ष माजी आ.प्रा.शरद पाटील (Prof. Sharad Patil) म्हणाले की, काँग्रेस पक्षाने देशाला उभे केले. घरादाराचा त्याग करुन स्वातंत्र्यासाठी (freedom) काँग्रेस लढली. देशाचे प्रधानमंत्री आजपर्यंत कधीही खरे बोलले नाही. नोटबंदी, टाळेबंदी सर्वसामान्य जनतेवर लादून गोरगरीबांचे प्रचंड हाल केले. गावातील प्रत्येक दुखी कष्टी माणसाच्या मदतीला धावून जाण्याचे काम युवक काँग्रेसच्या (Youth Congress) कार्याकर्त्यांनी करावे, पक्ष संघटन ही सामुदायिक जबाबदारी असते तरच पक्ष मजबुत होत असते.दरम्यान उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसला ताकद द्यायची असेल तर आ.कुणाल पाटील यांना राज्यात महत्वपूर्ण जबाबदारी देण्यासाठी आग्रही असल्याचे माजी आ.पाटील यांनी सांगितले.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर (District President Shamkant Saner) यांनी सांगितले की, लवकरच धुळे जिल्हयात तालुकानिहाय युवक काँग्रेसचे (Youth Congress) मेळावे घेवून युवकांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचे काम केले जाईल. पक्षातली पोकळी भरुन काढायची असेल तर प्रत्येक माणसापर्यंत जावून माणूस जोडण्याचे काम करावे.भविष्यात जो कार्यकर्ता पक्षासाठी राबले त्याचा पक्षात स्थान मिळू शकतो असेही अध्यक्ष सनेर यांनी सांगितले.

कार्यक्रमात महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव राहूल माणिक, पंकज चव्हाण, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश गर्दे, तर हरीष पाटील धुळे तालुका, गेंदा पावरा शिरपुर, रणजित गवळी साक्री,विरेंद्र झालसे शिंदेखडा आणि नावेद शेख यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नाशिक जिल्हा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडणून आल्याबद्दल स्वप्निल पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

कार्याक्रमाला माजी मंत्री रोहिदास पाटील, माजी खा.बापू चौरे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर,शहराध्यक्ष माजी आ.प्रा.शरद पाटील, महिला काँग्रेस अध्यक्षा गायत्री जयस्वाल, बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, खरेदी विक्रीचे चेअरमन लहू पाटील, माजी पं.स. सदस्य भगवान गर्दे, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ.दरबारसिंग गिरासे, बाजार समितीचे मुख्य प्रशासक रितेश पाटील, माजी जि.प. सदस्य साहेबराव खैरनार, माजी पं.स. सदस्य पंढीनाथ पाटील, ज्येष्ठ नेते शकिल अहमद, महिला काँग्रेस शहराध्यक्ष बानुबाई शिरसाठ, डॉ.एस.टी.पाटील, तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष अशोक सुडके,शशि रवंदळे, नाशिक युवक काँग्रेस अध्यक्ष स्वप्निल पाटील, माजी सभापती शांताराम भिल, संतोष राजपूत, अरुण पाटील,सागर पाटील, जयेंद्र पाटील, सोमनाथ पाटील, प्रा.मुकेश पाटील, राजीव पाटील, हर्षल साळुंके, बापू खैरनार, सागर गिरासे, सरपंच नागेश देवरे,विलास बिरारीस,शिवाजी अहिरे,दिनकर पाटील, किर्तीमंत कौठळकर,प्रदिप देसले,किरण नगराळे,हिरामण पाटील, ज्ञानेश्वर सोनवणे आदी उपस्थित होते.प्रास्ताविक जिल्हा काँग्रेसचे सरचिटणी डॉ.दरबारसिंग गिरासे यांनी केले तर सुत्रसंचालन जगदिश देवपूरकर यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या