Thursday, April 25, 2024
Homeजळगावजळगावात तरुणाची आत्महत्त्या

जळगावात तरुणाची आत्महत्त्या

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

शहरातील वाघनगर परिसरजवळील जिजाऊ नगरातील 37 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना दि.14 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली.

- Advertisement -

जिजाऊनगरातील रहिवासी सुरज शंकर बागडे (वय 37) याने दि.14 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास स्वतःच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

ऐन दिवाळीच्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी घरातील कर्त्यापुरुषाने आत्महत्या केल्याने नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.

त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, भाऊ, आई असा परिवार आहे. त्याचा मृतदेह शवविच्छेदनसाठी शासकीय महाविद्यालयात ठेवण्यात आला आहे.

आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. दरम्यान, सुरज बागडे यांची अंत्ययात्रा दि. 15 नोव्हेंबर रोजी दुपारी 11 वाजता जाखनीनगर, कंजरवाडा येथून निघणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या