रोलेटमध्ये पैसे हरला; कर्जबाजारी युवकाची आत्महत्या

नाशिक | Nashik

मोबाईल वरील रोलेट बिंगो गेम (Roulette Bingo Game) च्या नादातून कर्जबाजारीपणा मुळे एका विवाहित पुरुषाने रेल्वे खाली जाऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना उघडकीस आली आहे…

आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव राजेंद्र सुरेश दुरगुडे (वय ३५ रा. शनि चौक श्रमिक नगर, सातपूर) असे असून त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली (एक साडेचार व एक दीड वर्षाची), आई वडील, भाऊ असा परिवार आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नूसार, राजेंद्र हा सातपूर औद्योगिक वसाहती मध्ये (Satpur MIDC) एका लॉजीस्टिक कंपनी मध्ये सुपर वायझर म्हणून कामाला होतो. त्याला मोबाईल वरील रोलेट बिंगो गेम खेळण्याचे गेल्या तीन वर्षांपासून व्यसन लागले होते. यामध्ये तो अनेकदा जिंकायचा व हरायचा. हरल्या नंतर तो त्याच्या नातेवाईक व मित्राकडून उसने पैसे घेत होतो. असे सुमारे दीड दोन लाखाचे कर्ज त्याच्यावर झाले होते.

कर्जबाजारी झाल्यामुळे पैशा साठी पैसे वापस मागण्यासाठी तगादा लावले जात होते. त्यामुळे शुक्रवार ( दि. २०) सायंकाळी कामावरून थेट घोटीला मावशी च्या घराजवळ गाडी लावून कोणालाही न सांगता घोटी रेल्वे स्टेशनजवळ (Ghoti Railway Station) दारूच्या नशेत २० ऑगस्ट रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास धावत्या पंजाब मेल रेल्वेसमोर (Panjab Railway Mail) रेल्वे रुळावर उभे राहून, टायटॅनिक सारखे हात लांबहुन रेल्वे समोर येऊन आत्महत्या केली.

राजेंद्र यांच्या देहाचे तुकडे तुकडे झाल्याने लवकर ओळख पटवणे अवघड झाले होते.

अखेर वेगवेगळी माहिती गोळा करून सदर शरीराचे तुकडे रेल्वे कर्मचारी (Railway Workers) यांनी जमिनीत पुरुन दिले. याबाबत रेल्वे चालकांनी व प्रत्यक्षदर्शी माहिती दिली आहे. दि.२३ रोजी घोटी रेल्वे पोलीस (Ghoti Railway Police) यांना आत्महत्या करणारा राजेंद्र असल्याचे ओळख पटली. याबाबत घोटी रेल्वे पोलीस स्टेशन मध्ये आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *