Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रधक्कादायक! तरुणाचा कबड्डी खेळताना मैदानातच मृत्यू

धक्कादायक! तरुणाचा कबड्डी खेळताना मैदानातच मृत्यू

कबड्डी खेळत असताना 20 वर्षीय तरुणाचा मैतानातच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मालाड येथील महापालिकेच्या लव्ह गार्डनमध्ये कबड्डी सामने सुरू असताना ही घटना घडली आहे. किर्तिकराज मल्लन (20) असे तरुणाचे नाव आहे…

गुरुवारी मित्तल कॉलेजच्या माध्यमातून मालाड पश्चिमेकडील महापालिकेच्या लव गार्डनमध्ये कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. कार्तिक दिंडोशी संतोष नगर परिसरात राहणारा आहे. तो गोरेगावच्या विवेक कॉलेजमध्ये बीकॉम प्रथम वर्ष शिक्षण घेत होता.

- Advertisement -

Rohit Sharma : रोहित शर्माने रचला इतिहास! धोनी-विराटला न जमलेली कामगिरी दाखवली करून

कार्तिकला मित्तल विद्यालयाच्या वतीने खेळण्यासाठी बोलवण्यात आले होते. मित्तल कॉलेजचा सामना आकाश कॉलेजशी रंगला होता. सामन्यात किर्तीकने चढाई केली, यावेळी आकाश कॉलेजच्या खेळाडूंनी त्याला घेरले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

अल्पवयीन मुलीची हत्या करून बापाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

यात किर्तीक खाली कोसळला. पण तो परत उठलाच नाही, त्याचा जागीच मृत्यू झाला. किर्तीकच्या मृत्यूचे कारण अदयाप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या