Saturday, April 27, 2024
Homeजळगावभुसावळ येथे तरुणीचे अपहरण

भुसावळ येथे तरुणीचे अपहरण

भुसावळ – भाजी बाजारात गेलेल्या जामनेर रोडवरील 25 वर्षीय युवतीचे अज्ञात आरोपींनी चारचाकी वाहनातून अपहरण केल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रोफेसर कॉलनीतील रहिवासी असलेली 25 वर्षीय युवती 18 जून रोजी सकाळी साडेसात वाजता भाजी बाजारात जाते असल्याचे सांगून घराबाहेर पडली तर तिचे वाहन जामनेर रोडवरील कृष्णा नगराजवळ एका किराणा दुकानासमोर लावलेले आढळले मात्र युवती घरी न परतल्याने तिचा शोध घेण्यात आला व ती न सापडल्याने तिच्या अपहरणाची तक्रार येथील बाजारपेठ पोलिसात पालकांनी नोंदवली आहे.

- Advertisement -

तपास पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी हे करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या