Friday, April 26, 2024
Homeजळगावअति विषारी सर्प दंशाने तरूणाचा मृत्यू

अति विषारी सर्प दंशाने तरूणाचा मृत्यू

रांजणी ता.जामनेर – वार्ताहर Jamner

रांजणी येथील २१ वर्षीय तरुण राजेश भगवान साखरे हा विद्यार्थी घरी सकाळी ४.३० च्या सुमारास बैलांना चारा टाकत असतांना त्यास विषारी सर्पाने हाताच्या बोटाला चावा घेतला.

- Advertisement -

त्यांचेवर ताबडतोब प्रा.आरोग्य केंद्र बेटावद बु येथे उपचार करण्यात आले. परंतु सर्प हा मण्यार जातीचा अति विषारी असल्याने उपयोग झाला नाहीत. राजेश हा बोदवड येथे कॉलेजला शिक्षण घेत होता. या तरुणाच्या अकस्मात निधनाने रांजणी येथे शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्च्यात आई, वडिल, आजोबा, आजी, काका, काकू, एक भाऊ असा परीवार असुन तो वामन रामु साखरे यांचा नातू होत.

- Advertisment -

ताज्या बातम्या