Thursday, April 25, 2024
Homeजळगावघराकडे बघण्यावरुन तरुणाला मारहाण

घराकडे बघण्यावरुन तरुणाला मारहाण

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

तू हमेशा मेरे घर के तरफ क्यू देखता है (You always look at my house) म्हणत तरुणाला (youth) लाकडी दांडक्याने बेदम मारहाण (Beaten with a wooden stick) केल्याची घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास समता नगरात (Samata Nagar) घडली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

शहातील समता नगरातील वंजारी टेकडी येथे सैय्यद अकबर सैय्यद सल्लाउद्दीन (वय-22) हा राहतो. शनिवारी सायंकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास सैय्यद अकबर हा कामावरुन घरी येत असतांना त्याला सोनू आढळे याचा फोन आला. त्याने मला तुझ्याशी काम आहे तू गाडगेबाबा चौकात ये असे सांगितले. त्यानुसार अकबर हा गाडगेबाबा चौकात आला. यावेळी याठिकाणी सोनू आढळे व सुशांत कोळी हे उभे होते.

सोनू आढाळे याने मै कू तेरेसे बात करनी की है तू गाडी पै बैठ असे म्हणत त्यांनी त्याला जबरदस्ती दुचाकीवर बसविले. ते तिघ दुचाकीने गाडगेबाबा चौकातून पठाणबाबाकडे जाणार्‍या रस्त्याच्या बाजूला असलेल्या मैदानावर घेवून गेले. यापुर्वीच येथे पप्पू आढळे, आकाश भालेराव उपस्थित होते.

जीवेठार मारण्याच्या उद्देशाने करीत होते मारहाण

या मारहाणीत चौघांनी सैय्यद अकबरला हातापायांवर व खांद्यावर व चेहर्‍यावर गंभीर दुखापत झाली आहे. यावेळी त्याला समीर भांजा याचा फोन आल्याने त्याने घटनेची माहिती त्याला दिली. अकबरला जीवेठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण करीत असल्याने समीर भांजा, समीर शेख, नसीर शेख व अकबरच्या आई वडीलांनी त्याला आढळे यांच्या तावडीतून सोडविले.

लाकडी दांडक्याने केली मारहा

सैय्यद अकबर याला चौघांनी दुचाकीवरुन उतरवित सोनू आढळे याने शिवीगाळ करीत तू हमेशा मेरे घर के तरफ क्यू देखता है असे म्हणत त्याने अकबरच्या कानशिलात लगावली. मला माहित आहे तु माझ्या घराकडे का पाहतो ते तुला मी जीवंत सोडणार नाही असे म्हणत सुशांत कोळी व त्याच्या मित्रांनी हातातील लाकडी दांडक्याने अकबरला मारहाण करण्यास सुरुवात केली.

उपचारानंतर दिली तक्रार

जखमी सैय्यद अकबर याच्यावर उपचार केल्यानंतर त्याने रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार सोनू आढळे, सुशांत कोळी, पप्पू आढळे, आकाश भालेराव यांच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या