Thursday, April 25, 2024
Homeनगरयुवतीला सोशल मीडियावर अश्लील मेसेज करून धमकी

युवतीला सोशल मीडियावर अश्लील मेसेज करून धमकी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दोघा सख्ख्या भावांनी शाळेत जाणार्‍या युवतीचा पाठलाग करून तिला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून अश्लील मेसेज केले, फोनवरूनही शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची घटना समोर आली आहे. पीडित युवतीच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

सोहेल गणी शेख व सरफराज गणी शेख (दोघे रा. गजराजनगर, नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी युवती पेपर देण्यासाठी शाळेत जात असताना सोहेल व सरफराज तिचा पाठलाग करत असत व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी द्यायचे. तरीसुध्द फिर्यादीने त्यांना काही प्रतिउत्तर दिले नाही.

फिर्यादी त्यांना बोलली नाही म्हणून सोहेल व सरफराज यांनी फिर्यादीच्या नंबरवरील व्हॉट्सअप व फेसबुकवरती अश्लील स्टीकर व बंदूक स्टीक टाकून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. फिर्यादीला फोन करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या