Tuesday, April 23, 2024
Homeजळगावयोजना पाटील यांचा राज्यस्तरीय नारीरत्न पुरस्काराने सन्मान

योजना पाटील यांचा राज्यस्तरीय नारीरत्न पुरस्काराने सन्मान

भडगाव – प्रतिनिधी bhadgaon

महिला दक्षता अध्यक्षा नगरसेविका योजना पाटील (Yojana Patil) यांना जळगाव (jalgaon) राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय नारीरत्न पुरस्काराने (Mayor Jayashree Mahajan) महापौर जयश्री महाजन यांचे हस्ते मानपत्र सन्मान स्मृतीचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले.

- Advertisement -

योजना पाटील यांचे सामाजिक, क्षैक्षणिक, राजकीय, धार्मिक, क्रिडा, पर्यावरण, बचतगट, महिला सक्षमीकरण, अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती इ. क्षेत्रामध्ये तसेच कोरोना पार्श्वभूमिवर केलेले उत्कृष्ट कार्य प्रशंसनिय आहे. यशश्विनी सामाजिक अभियान प्रमुख महिला दक्षता तथा मानव संरक्षण महिला शक्ति अध्यक्ष्या तसेच भडगांव शहराच्या नगरसेविका म्हणून त्या काम करताना शहराच्या सर्वांगीण विकसासाठी त्यांचा सतत पाठपुरावा सुरु असतो.

शासनाच्या विविध योजना निराधार गरजूंना मिळऊन देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. गरजु विद्यार्थ्याना मदत करणे, महिला, कष्टकरी, वंचित, उपेक्षितांना वेगवेगळ्या प्रकारे नेहमी मदत करीत असतात. त्यामुळेच त्यांना विविध क्षेत्रातील आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे असे राजनंदिनी संस्था अध्यक्षा संदीपा वाघ, सचिव ज्ञानेश्वर वाघ यांनी प्रमुख पदाधिकारी महापौर जयश्री महाजन, सहाय्यक आयुक्त उदय पाटील, प्रा.डॉ.शैलेन्द्र भणगे, विस्ताराधिकारी रागिनी चव्हाण, प्रायोजक कल्पना पाटील, दिलीप पाटील, क्रिडा संचालक प्रविण पाटील, कांचन राणे, मिनाक्षी चव्हाण, अध्यक्ष संभाजी पाटील, प्रतिभा पाटील, सुंदर कुरहाडे यांचे उपस्थितीत योजना पाटील यांच्या राज्यस्तरीय नारीरत्न पुरस्कार गौरव प्रसंगी नमूद केले व उज्वल यशस्वी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या