Friday, April 26, 2024
Homeनगरयोगेश वाघमारे यांचे खूनातील उर्वरित आरोपींना अटक करून कठोर कारवाई करा

योगेश वाघमारे यांचे खूनातील उर्वरित आरोपींना अटक करून कठोर कारवाई करा

राहाता |वार्ताहर| Rahata

राहाता येथील युवक योगेश किसन वाघमारे यांच्या हत्याप्रकरणी पसार असलेल्या आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा न्यायासाठी धरणे आंदोलन करणार असल्याचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या राहाता तालुका उपाध्यक्षा अर्चना काकडे यांनी शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांना दिले आहे.

- Advertisement -

या निवेदनात म्हटले आहे की आम्ही सर्व नातेवाईक येथील नागरिक लेखी तक्रार निवेदन सादर करतो की, दि. 1 जून रोजी योगेश किसन वाघमारे या युवकाची राहाता शहरातील आंबेडकरनगरमधील घरकुलाच्या इमारतीमध्ये धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या करण्यात आली होती. यातील आरोपीवर खुनाच्या गुन्ह्यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल आहे. त्यातील काही आरोपींना अटक केलेली असली तरी उर्वरित आरोपी पसार आहेत.

या सर्व आरोपींपासून आमचे जीवितास धोका आहे. तसेच यातील काही आरोपीवर यापूर्वी सुद्धा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आरोपींचे विविध प्रकारच्या बँकांमध्ये जाणे येणे सुरू असल्याचेही त्यांनी या निवेदनात म्हटले आहे. उर्वरित पसार आरोपींना तातडीने अटक करावी, अन्यथा न्यायासाठी आम्हाला धरणे आंदोलन सुरू करावे लागेल. एवढे करूनही पुढे प्रशासनाने कारवाई न केल्यास उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा या निवेदनाद्वारे काकडे यांनी दिला आहे.

राहाता शहरातील योगेश किसन वाघमारे या तरुणाची हत्या करणार्‍या आरोपीपासून आमचे कुटुंबियांच्या जीवितास धोका आहे. त्यांना तातडीने अटक करण्यात येऊन त्यांचे विरुद्ध 120 ब प्रमाणे तात्काळ कारवाई करावी, या मागणीचे निवेदन हल्ल्यात मयत तरुण योगेश वाघमारे यांचे वडील किसन वाघमारे यांनी शिर्डी पोलीस उपविभागीय अधिकारी तसेच पोलिस निरीक्षक राहाता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या