Friday, April 26, 2024
Homeनाशिकहोय! आम्ही नाशिक पोलीस, भटक्या श्वानांची भागवतो भूक

होय! आम्ही नाशिक पोलीस, भटक्या श्वानांची भागवतो भूक

नाशिक | प्रतिनिधी

सर्वत्र कोरोना आजाराच्या लाटेत जो तो आपापल्या पध्दतीने मनुष्यांना अन्नदान, किराणा वाटत आहे. पंरतु मुक्या जणावरांकडे बहूतांश दुर्लक्ष आहे. अशा पडत्या काळात भटक्या श्वानांना पोलिस दलातील सहायक निरिक्षक सुशीला आव्हाड व व्यायाम प्रशिक्षक राज व यश आव्हाड या प्राणि मित्रानी रोज स्वखर्चाने मोकाट श्वानांना गेल्या पंधरा दिवसां पासून बिस्कीटे तसेच इतर अन्न देऊन भूक भागवण्याचा प्रयत्न करत आहेत…

- Advertisement -

पांडवलेणी, फाळके स्मारक, ठक्कर बाजार येथिल मोकाट श्वानांना स्वखर्चाने बिस्किटे खायला देऊन त्यांची भूक ते भागवत आहे.

भद्रकाली पोलिस ठाण्यातील सुशीला आव्हाड यांचे घरात पाळीव प्राणी असल्याने त्यांच्याबद्दल परिवारास जिव्हाळा निर्माण झाला आहे.सर्वत्र लॉकडाउन असल्याने मोकाट जनावरांची खाण्याची चिंता भेडसावत असताना मनपाने पकडून नेलेल्या मोकाट श्वानांना पांडवलेणी येथे निर्बिजीकरण करून सोडले जात असल्याने या ठिकाणी मोकाट श्वानांची संख्या मोठ़या प्रमाणात आहे.

दररोज ऊन वारा पावसाची चिंता न करता सायंकाळी पाच वाजता यश, राज व त्यांच्या मातोश्री या मोकाट प्राण्यांना बिस्कीटे देऊन त्यांची क्षुधा शांती करत आहे.

आपण जर यांना खायला घेऊन गेलो नाही तर उपाशी राहतील या भावनेने नित्यनियमाने त्यांची भूक आम्ही भागवत आहोत असे आव्हाड यांनी सांगीतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या