Friday, April 26, 2024
Homeनाशिकरुग्णसंख्यावाढीने येवला तालुका प्रभावित

रुग्णसंख्यावाढीने येवला तालुका प्रभावित

येवला । प्रतिनिधी Yeola

नगर जिल्ह्यातील Ahmed Nagar District करोना corona रुग्णसंख्यावाढीचा परिणाम येवला तालुक्यावर होत असून येवला तालुक्यातील Yeola Taluka नागरिकांनी नगर जिल्ह्यात जात असताना काळजी घ्यावी. करोनाची सध्याची परिस्थिती नियंत्रणात असून डेल्टा व्हेरियंटचे स्वरूप अद्याप बदललेले नाही. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री राजेश टोपे Health Minister Rajesh Tope यांनी यावेळी केले.

- Advertisement -

आरोग्यमंत्री टोपे नाशिक येथील बैठकीसाठी शहरातून जात असताना पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयात काही वेळासाठी थांबले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी त्यांचे स्वागत केले.

टोपे यांच्या स्वागतासाठी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय बनकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, सचिन कळमकर, प्रकाश वाघ, दीपक लोणारी, डॉ. संजय जाधव, सुनील पैठणकर, संतोष खैरनार, भाऊसाहेब धनवटे, मुश्रीफ शहा, सुभाष गांगुर्डे, काँग्रेस पक्षाचे एकनाथ गायकवाड यांच्यासह पालकमंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

अंदरसूल येथे आरोग्यमंत्री टोपे यांचे जि. प. सदस्य महेंद्र काले, बाजार समितीचे माजी सभापती मकरंद सोनवणे, किसन धनगे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या