वार्षिक राशिभविष्य 2023 : सिंह : प्रथमत: परिश्रम नंतर भाग्यकारक

jalgaon-digital
5 Min Read

पुरुष – सिंह राशी व्यक्तींना परिश्रम करण्याची सवयच असते. प्रत्येक कामासाठी आपण खूप मेहनत घेत असतात. नवीन वर्षातील तीन महिने आपण जे काही कार्य करीत आहात त्यासाठी खूप मेहनत घ्याल. या काळात मेहनत घेऊनही फारसे यश आपणास प्राप्त होणार नाहीत. परंतु या मेहनतीचे फळ व ग्रहगोलाचा लाभ आपणास मे-2023 नंतर पुरेपूर मिळणार आहे. उत्तुंग शिखर आपण गाठणार आहे. आपल्या भाग्याची घोडदौड नंतर पूर्ण वर्षभर राहणार आहे. आपले यशाचे सर्वत्र कौतुक होणार आहे. 2023 चे आपणास भाग्यकारी ठरणार आहे.

स्त्रीया – सुरुवातीचा काळ हा अस्थिरतेचा असेल. संसारात वाद असतील तर वाद वाढीस लागतील. शेजारी-पाजारीदेखील वाद होतील. मनात काहीना काही शंका-कुशंका निर्माण होतील. रात्रीची झोप हरवेल. जवळचे माणसे दूरदेखील जातील. मे-2023 नंतरचा काळ आपण बोलावे आणि इतरांनी ऐकावे. आपली इच्छा या काळात पूर्ण होईल. देवी-देवतांना आपण नवस बोलले असाल तर त्याची प्रचिती आपणास येईल. या काळात तीर्थयात्रा संपन्न कराल. घरात एखादे मंगलकार्य आपले हातून संपन्न होईल. सुख, संपन्न, वैभवशाली हा काळ राहील. नोकरवर्ग-नोकरवर्गास नोकरी करतांना आपण नोकर आहोत याचे भान ठेवूनच कार्य करावे. एखादी अनुचित कृती, एखादे कठोर शब्द आपणास नोकरी घालविण्यास पुरे ठरेल. प्रथम तीन महिने ही कष्टकारक जाणार आहेत. ही निमुटपणे आपण काढावीत. कामे अधिक करावीत. मे-2023 नंतर आपणावर वरिष्ठ अधिकारी वर्गाची मर्जी राहील. आपणास बढती मिळेल. पाहिजे त्या जागी बदली होईल व पगार वाढपण होईल. नोकरी इच्छुकांनी आपण प्रयत्न करावा उत्तमातील उत्तम नोकरी आपणास प्राप्त होईल. दूरवर प्रवासदेखील होणार आहेत.

व्यवसायिक – घाईगडबड व्यवसायिकांनी अजिबात करु नका. पुढील आशा धरुनच आपण व्यवसाय करावा. प्रथम तीन महिने व्यवसायात खूपच अडचणी येतील. काही प्रमाणात नुकसानदेखील होईल. या काळात आपण सर्व व्यवसायाची कामे कायद्याला धरुनच करावीत. मे ते डिसेंबर-2023चा काळ हा व्यापारी व्यवसायिकांना भरभराटीचा काळ असेल. या काळात आपण धाडसाने व्यापार करावा. व्यापारनिमित्त बाहेरगावी प्रवासदेखील होणार आहेत. व्यवसाय ठिकाणी आपले हातून मंगलकार्यदेखील संपन्न होईल. हा काळ भरभराटीचा राहील.

विद्यार्थीवर्ग – विद्यार्थीवर्गाने जानेवारी, फेब्रुवारी, मार्च-2023 मधील हे महिने खूप अडचणीचे जाणार आहेत. अभ्यासात मन न लागणे. चित्त विचलित होणे, चुकीचे मित्र संगती लागेल. अभ्यास सोडून इतर कार्यात मन लागणे यामुळे अभ्यासात दुर्लक्ष होईल. परंतु भाग्योदयाचा काळ हा मेनंतर डिसेंबर-2023चा असणार आहे. म्हणून आपण या भाग्याकडे पाठ फिरवू नका. पुढील भाग्यासाठी आपण या वर्षाचे सुरुवातीपासूनच मन लावून अभ्यास करावा, यश, किर्ती, मान, सन्मान, आपणासमोर आहे. त्याचा स्वीकार करण्यासाठी इतरत्र कार्य न करता केवळ आपण आपले लक्ष अभ्यासाकडे ठेवावे.

राजकारणी – राजकारणी व्यक्तींना प्रथम चार महिने हे तारेवरची कसरत करावी लागणार आहे. आपण पक्ष सोडून गेलेले असाल तर पुनरुपी पक्षात दाखल व्हा अन्यथा पक्ष सोडून गेले आणि धुपाटणे हाती आले असे होणार आहे. आम्ही सांगत आहोत ग्रहगोलाचा विचार करुन शेवटी आपले अनुभवानुसार कार्य करावे. मे महिना यश मिळविण्याचा हा काळ असेल. नवीन युवकांनी मे ते डिसेंबर 2023 मध्ये राजकारणात प्रवेश करावा. मातब्बर उमेदवारासमोर आपण उत्तम टक्कर देणार आहात. कार्यकर्तेपदातून नेतेपद मिळविण्यासाठीची ही संधी आपणास मिळणार आहे.

आरोग्य – वृद्ध मंडळींनी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च-2023 हे तीन महिने आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. या काळात पाय घसरुन पडण्याचा धोका आहे. जुनी दुखणी पुनरुपी दुखणी डोके वर काढतील. गर्भवती स्त्रीयांनी आपले प्रकृतीस जपावे. लहान मुलांकडे विशेष लक्ष द्यावे. मे ते डिसेंबर-2023चा काळ आपणास कठिणातील आरोग्य समस्या असली तरी आपणास आरोग्य लाभेल. अती जुनाट विकारग्रस्त व्यक्तींनादेखील या काळात आरोग्यात सुधारणा होईल. युवावर्गाचे आरोग्य उत्तम राहणारे आहेत. दवाखाना बघावा लागणार नाही. आर्थिक-सिंह राशी व्यक्तींना वर्षारंभीचा हा काळ आर्थिकबाबतीत समस्या पूर्ण असणार आहे. घेणेकरी कर्जप्रकरणी आपले मागे तगादा लावतील. त्यात आपले येत असलेले आर्थिक स्त्रोत हे कमी होतील. त्यात कारण नसतांनाचे खर्च करावे लागणार आहेत. पैपाव्हण्यांची वर्दळ घरात असल्यामुळे तो पण खर्च वाढणार आहे. मे ते डिसेंबर-2023 हा काळ आपणास आर्थिक प्रगतीचा असणार आहे. जे काही कार्य कराल त्यातून अधिक आर्थिक लाभ मिळणार आहे. नवीन कार्य या काळात सुरु केल्यास यातूनही आर्थिक लाभ होईल.

नातीगोती – आपली मुले, मुली शिक्षण घेत असल्यास त्यांना नवीन शैक्षणिक वर्ष उत्तम राहील. स्पर्धा परीक्षेत यशस्वी होतील. मामा, लहान काकू, लहान मावशी यांचे व्यवसाय असल्यास त्यांना लाभकारक ठरतील. आपणासी मात्र यांचे गैरसमज होण्याची शक्यता आहे. आपले लहान भाऊ, लहान बहिण यांना त्यांच्या कार्यात अडथळे येतील. आपणामध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. याबाबत मधूर संबंध होतील. याकडे लक्ष द्यावे. सासूवाडीकडून लाभ मिळण्याचे योग आहेत. सासुरवाडीला मंगलकार्याच्या आयोजनात आपणास भाग घ्यावा लागेल. वाड-वडिलांकडून भूमीचा वास्तुचा लाभ होण्याचे योग आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *