Saturday, April 27, 2024
Homeजळगावदागिने, रोकड घेऊन नवविवाहिता पसार !

दागिने, रोकड घेऊन नवविवाहिता पसार !

यावल – Yawal – प्रतिनिधी :

येथील शेतमजुरी करणार्‍या तरुणाची लग्न लावण्याच्या नांवा खाली फसवणुक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

- Advertisement -

दरम्यान लग्न झालेली नवविवाहीत तरूणीने आपल्या सासरवाडीतून पळ काढल्याने त्या तरूणाने आपली लग्न लावून देण्याच्या नावाखाली फसवणुक झाल्याची तक्रार पोलीसात दिली आहे.

या सदंर्भात मिळालेली माहीती अशी की, डिंगबर देविदास फेगडे वय 30 वर्ष राहणार महाजन गल्ली यावल यांनी यावल पोलीसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, अकलुद तालुका यावल येथील राहणारे साहेबराव कोळी आणी अनिल परदेशी यांनी व बहीणाबाई रावसाहेब अंबुरे राहणार दर्गा रोड परभणी यांनी जालना येथे राहणार्‍या एका गरीब कुटुंबातील तरूणीशी विवाह लावून देण्याच्या नावाखाली आपली फसवणूक केल्याचे म्हटले आहे.

दि.7 नोव्हेंबर 2020 रोजी यावल येथील विठ्ठल मंदीरात हिन्दु रितीरिवाजा प्रमाणे डिगंबर देवीदास फेगडे यांचे जालना येथे राहणारी तरुणी सोनाली कुर्‍हाडे हिच्याशी लग्न लावून दिले .

मात्र दिनांक 12 नोव्हेंबर 20 रोजी दिगंबर फेगडे यांचे वडील देविदास फेगडे, सकाळी 5 वाजता व मी दुपारी 1 वाजता कामासाठी गावात गेल्याने घरात एकटी असलेल्या माझी पत्नी सोनाली कुर्‍हाडे हिने घराचा दरवाजा बंद करून चाबी शेजारील वाड्यातील लहान मुलगा कल्पेश शशिकांत फेगडे याच्याकडे दिली व मंदीरात जावून येते असे सांगून अंगावरील 25000 रुपये किमतीचे दागिने व 5000 रुपयांच्या साडया व काकाचा एअरटेल कंपनीचा मोबाईल घेवून गेली ती उशीरापर्यंत न आल्याने अखेर लग्न लावणार्‍या साहेबराव कोळी यांच्याशी मोबाईलवर सोनाली संदर्भात विचारणा केली असता कोळी यांनी आपण तुझे लग्न लावून दिले आहे सोनाली बहीणाबाई यांना आपण ओळखत नसल्याचे सांगीतल्याने आपली लग्न लावून देण्याच्या नांवाखाली सुमारे 94 हजार तीनशे रुपयाची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्याने लग्न जोडणारे साहेबराव कोडी व अनिल परदेशी राहणार अकलूज व बहीणाबाई अंबुरे व सोनाली कुर्‍हाडे राहणार जालना या चारही जणांविरुद्ध यावल पोलिसात भाग 5 गुरनं 190/20 आयपीसी 420, 406, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक एस.पी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या