Friday, April 26, 2024
Homeजळगावशेतकर्यांची 14 लाखात फसवणुक

शेतकर्यांची 14 लाखात फसवणुक

यावल – Yawal – प्रतिनिधी :

शहरासह तालुक्यातील आठ केळी उत्पादकांची केळी खरेदि करून त्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ करून केळी उत्पादकांची

- Advertisement -

१३ लाख ६६ हजार रुपयांची फसवणुक केल्याच्या कारणावरून रावेर येथील एका तर तालुक्यातील सांगवी खुर्द येथील एका अशा दोन व्यापा-या विरूध्द येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रावेर येथील दत्तगुरू केला एजंसीचे संचालक येथील सुभाष कांतीलाल पाटील व तालुक्यातील सांगवी खुर्द येथील गणेश केला गुृचे संचालक रविंद्र ओंकार सपकाळ यांनी मार्च ते जुन २०२० यादरम्यान शहरातील देवनाथ भावसींग पाटील -एक लाख ५२ हजार ६०४ रुपये, डॉ. गणेश लक्ष्मन रावते तीन लाख सात हजार ९६१, अरूण कुमार सुपडू खेडकर दोन लाख ८४ हजार ५४३ , पराग विजय सराफ एक लाख दोन हजार २९४ , संदिप सतीष वायकोळे एक लाख, संभाजी काशिनाथ लावणे १७ हजार ९७० , तर तालुक्यातील नावरे येथील देविदास उदोसींग पाटील एक लाख ८० हजार २८६ , महेंद्र शिवाजी पाटील दोन लाख ५ हजार ९८४ रुपये अशी आठ शेतक-यांची १३ लाख ६५ हजार ८४२ रुपयामध्ये फसवणूक केली आहे.

शेतक-यांनी वारंवार व्यापा-याकडे मागणी करूनही दोन्ही व्यापा-यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली गेल्या आठवडयात केळी उत्पादकांनी येथील पो. नि. ना तक्ररी दिल्या होत्या सोमवारी केळी उत्पादक डॉ. गणेश रावते योंच्या फिर्यादिवरून येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पो. नि. अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सुनिता कोळपकर पुढील तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या