Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्या'अबकी बार 400 पार' पंतप्रधान मोदी यांची यवतमाळमधून घोषणा

‘अबकी बार 400 पार’ पंतप्रधान मोदी यांची यवतमाळमधून घोषणा

यवतमाळ

आज विविध विकासकामांचे उद्घाटन व महिला बचत गटाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळला आले होते. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली. ‘जय भवानी, जय शिवाजी, जय सेवालाल’, असे अभिवादन करून भाषणाला सुरुवात करत . बंजारा भाषेत महिलांना नमस्कार केला. मी 10 वर्ष आधी चाय पे चर्चा करण्यासाठी आलो तेव्हा आपण मला भरभरुन आशीर्वाद दिले. मी 2019 मध्ये आलो तेव्हा देखील भरभरुन प्रेम दिलं 310 जागा दिल्या. आता मी 2024 च्या निवडणुकीच्या आधी आलो आहे. आज देशात एकच आवाज गुंजत आहे. अब की बार मोदी सरकार. आज इतक्या मोठ्या संख्येने महिला आशीर्वाद देण्यासाठी आल्या आहेत. यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर सहित पूर्ण विदर्भाचा आशीर्वाद मिळत आहे. विदर्भाने ठरविले आहे युती सरकार या वेळेस 400 पार होणार आहे असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

यावेळी त्यांनीनी काँग्रेसवर सडकून टीका केली. तसेच त्यांनी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले दिल्लीहून विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या नावावर पॅकेज घोषित व्हायचे. पण ते पॅकेज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याआधी मध्ये लुटलं जात होतं. गाव, गरीब शेतकरी, आदिवासींना काहीच मिळायचं नाही, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

आज बघा, मी एक बटन दाबलं आणि पाहतापाहता पीएम किसान सन्मान योजनेचे 21 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्य बँक खात्यात गेले. आकडा लहान नाही. हीच तर मोदीची गॅरंटी आहे. हर घर जलची गॅरंटी दिली होती. आज 100 पैकी 75 ग्रामीण कुटुंबांच्या घरी पाईपने पाणी पोहोचलं आहे. महाराष्ट्रात 50 लाख पेक्षा कमी परिवारांपर्यंत नळाचं कनेक्शन होतं. आज सव्वा करोड नागरिकांपर्यंत नळ कलेक्शन आहे असा दावा पंतप्रधान मोदींनी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या