यावल कृउबा समितीवर भाजपा सेनेचा डंका

jalgaon-digital
1 Min Read

यावल – प्रतिनिधी

यावल तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Agricultural Produce Market Committee) सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीत (election) सभापती पदासाठी हर्षल गोविंदा पाटील तर उपसभापती पदासाठी दगडू जनार्दन कोळी उर्फ बबलू यांची प्रत्येकी एकमेव अर्ज आल्याने निवडणूक अधिकारी सहकार विभाग लेखाधिकारी वर्ग एक जळगाव पी एफ चव्हाण यांनी बिनविरोध निवड जाहीर केली. याप्रसंगी सर्व नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते विशेष म्हणजे गेल्या तीन पंचवार्षिक पासून भाजपा सेनेचाच डंका होता पुन्हा चौथ्या टर्मला सुद्धा त्यांच्याकडे सत्ता राखली तेही स्पष्ट बहुमताने.

यावल तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि उपसभापती पदासाठी झालेल्या दिनांक 18 मे गुरुवार रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभागृहात निवडणूक घेण्यात आली त्यात भारतीय जनता पार्टीचे मा जि प सभापती तथा मा उपसभापती पंचायत समिती यावल यांनी सहकार पॅनल तर्फे सोसायटी मतदार संघ जनरल मधून पहिल्यांदाच निवडणूक लढवली हर्षल गोविंदा पाटील यांचा एकमेव अर्ज सभापती पदासाठी आला होता तर उपसभापती पदासाठी ग्रामपंचायत मतदार संघातून प्रथमच किनगाव येथील दगडू उर्फ बबलू जनार्धन कोळी यांनी एकमेव नामांकन दाखल केले होते निवडणूक अधिकारी पीएफ चव्हाण यांनी सभापती व उपसभापती यांची एकमेव नामांकन दाखल झाल्याने ते बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *