यावल ; दोघं उपोषणकर्त्यांना पोलिसांनी केले दवाखान्यात भरती

यावल – प्रतिनिधी

तालुक्यातील सावखेडा सीम येथील ग्रामपंचायतच्या पंधराव्या वित्त आयोगातील व्यवहारातील अनियमितता व ग्रामपंचायतीतील पाणीपट्टी कराच्या आकारांनी मधील अपहर प्रकरणी सावखेडा सीम येथील उपोषणकर्त्यांमधील दोघांची प्रकृती खालावल्याने पोलिसांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार पोलीस बडा चा वापर करून दोघं उपोषणकर्त्यांना औषधोपचारासाठी ग्रामीण रुग्णालय यावल येथे उचलून नेऊन त्यांच्यावर औषधोपचार करण्यात येत आहे तर दोघांची प्रकृती स्थिर नसल्यामुळे त्यांना येथील डॉक्टर धीरज चौधरी यांच्या दवाखान्यांमध्ये औषधोपचारासाठी दाखल केले आहे तर उद्या सोमवारी सकाळी 11 वाजता भुसावळ टी पॉईंट वर दहिगाव सावखेडा परिसरातील ग्रामस्थां सह आघाडीतील प्रमुख तिघ पक्षांसह निळे निशान संघटनेने ही रस्ता रोको साठी पाठिंबा दिला असून नेमकं हे प्रकरण आता कोणत्या मूळावर पोहोचते हे काळच ठरवेल.

14 ऑगस्ट 23 पासून सदरचे उपोषण सुरू होते सातव्या दिवशी सकाळी उपोषण करते शेखर सोपान पाटील यांची प्रकृती स्थिर असून रहमान तडवी व सलीम तडवी यांची प्रकृती ढासळल्यामुळे वैद्यकीय अधिकारी यावल ग्रामीण रुग्णालय व सहकार्यांनी तपासणी करून तसा अहवाल पोलीस प्रशासनाकडे दिला सदर दोघं उपोषणकर्त्यांना दवाखान्यात हलवल्याशिवाय पर्याय नाही असे पोलिसांनी उपोषण स्थळी येऊन उपोषणकर्त्यांना विनंती केली त्यांनी विनंती मान्य न केल्यामुळे यावल पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय गोसावी व पीएसआय मोरे सहाय्यक फौजदार पाचपुळे व कॉन्स्टेबल सुशील घुगेसह सहकाऱ्यांनी रहमान तडवी व सलीम तडवी यांना उचलून ॲम्बुलन्स मध्ये घातले व यावल ग्रामीण रुग्णालयात औषध उपचारासाठी दाखल केले या ठिकाणी प्राथमिक उपचार करण्यात येऊन डॉक्टर धीरज चौधरी यांच्याकडे पुढील औषधोपचारासाठी यावलमध्येच दवाखान्यात दाखल केलेले आहे

काँग्रेस गटनेता यावल पंचायत समिती शेखर सोपान पाटील हे प्रशासनाने गंभीर दखल घेणे गरजेचे होते मात्र कुणाच्यातरी दबावाखाली प्रशासन काम करीत आहे आज आठ दिवस उलटूनही लोकशाहीमध्ये आम्हाला न्याय मिळालेला नाही त्यामुळे त्यांनी दवाखान्यात न जाता उपोषण सुरूच ठेवलेले आहे

उपोषणा संदर्भात यावल रावेर तालुक्याचे आमदार शिरीष दादा चौधरी माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील तसेच तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद माजी घटनेता प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्यासह आदींनी वरिष्ठ पातळीवर या संदर्भात भ्रमणध्वनी वरून वारंवार संपर्क साधला नव्हे तर काल शिरीष दादा चौधरी यांच्या मुलाचा वाढदिवस असताना सुद्धा कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात जाऊन ग्रामपंचायतीचे दप्तर त्या ठिकाणी बोलावले व सहा लोकांची कमिटी नियुक्त करून दप्तर तपासणी सुरू केलेली आहे नेमका आता दप्तर तपासणी मध्ये काय अहवाल येतो याकडे लक्ष लागून आहे

पुन्हा रस्ता रोको

शेखर सोपान पाटील सारख्या माणसाला पंचायत समिती समोर उपोषणाला बसून आठ दिवस झाले तरी प्रशासनाकडून न्याय मिळत नाही त्यामुळे सावखेडा सिम दहिगाव परसाळे वडरी मोराळा हरिपुरा परिसरातील नागरिकांसह आघाडीतील शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह निडेनिशान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज सोमवारी दुपारी अकरा वाजता भुसावळ टी पॉईंट वर पुन्हा रस्ता रोको चा इशारा दिलेला आहे या संदर्भात पोलिसांना पत्रही दिलेले आहे जिल्हा परिषदेचे प्रमुख अधिकारी जो वेळ पर्यंत आमच्या मागण्या मंजूर करत नाही संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देत नाहीत व रस्ता रोको ठिकाणी येऊन आमच्याशी चर्चा करणार नाही तू वेळ पर्यंत रस्ता रोको चालूच ठेवू असा इशाराही त्यांनी दिलेला आहे


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *