सिद्धक्षेत्र मांगीतुंगी येथे उद्यापासून यात्रोत्सव

उमराणे | विनोद पाटणी Umrane

सालाबादप्रमाणे दिगंबर जैन सिद्धक्षेत्र श्रीमांगीतुंगीजी (Digambar Jain Siddhakshetra Srimangitungiji) येथे वार्षिक यात्रा महोत्सव दिनांक 6 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर संपन्न होत आहे यात्रेची जोरदार तयारी सुरू असून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आली असल्याची माहिती मांगीतुंगीजी ट्रस्टचे अध्यक्ष सुमेरजी काला यांनी दिली आहे.

ह्यानिमित्ताने आचार्य तीर्थनंदीजी महाराज ,सिद्धांतकीर्ती जी महाराज ,भावनंदीजी महाराज , विशेषसागरजी महाराज ,सुहितसागरजी महाराज ,आर्यिका पावनश्री माताजी ,सुनंदामतीजी माताजी ,सुबोधमतीजी माताजी मोक्षश्री माताजी यांच्या मंगल सानिध्यात व मार्गदर्शनाखाली यात्रा महोत्सव संपन्न होत आहे .

रविवार दिनांक 6 रोजी सकाळी भगवान पार्श्वनाथ अभिषेक, पूजन दुपारी 3 वाजता मंगलप्रवचन ,सायंकाळी 7 वाजता मंगल आरती , सांस्कृतिक कार्यक्रम ,दिनांक 7 रोजी मांगीतुंगीजी पहाडावर भव्यपंचामृत अभिषेक, 3 वाजता भगवान मुनीसुव्रतनाथजीचा महामस्तकाभिषेक- पिंछि परिवर्तन ,मंगल प्रवचन ,सायंकाळी सात वाजता मंगलआरती, सांस्कृतिक कार्यक्रम दिनांक 8 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता भगवान चिंतामणी पार्श्वनाथ महामस्तकाभिषेक , दुपारी दोन वाजता भव्य रथयात्रा व पांडूकशिला येथे एकशे आठ कळसांनी अभिषेक होणार. सायंकाळी सात वाजता महाआरती सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे तरी जैन बांधवांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन व्यवस्थापक डॉ. सुरजमल जैन , पंडित शैलेश जैन यांनी केले आहे.