Thursday, April 25, 2024
Homeनाशिकयेळकोट येळकोट जय मल्हारचा गजर

येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

गोदाघाटावरील खंडोबा मंदिरात दरवर्षी चंपाषष्ठीला होणारा यात्रोत्सव या वर्षी कोरोनाच्या सावटामुळे रद्द झालेला असला तरी भाविकांनी मोठ्या श्रध्देने मंदिराच्या बाहेरूनच दर्शन घेतले. मंदिराच्या बाहेर भंडाऱ्याची उधळण करीत तळी भरण्यात येत होती. वांगी भरीतचा नैवद्य मंदिराच्या बाहेर भाविक ठेवीत होते.

- Advertisement -

महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबाची षडनवरात्रीस मंगळवारी सुरवात झाली आहे. रविवारी (दि. २०) रोजी चंपाषष्ठीला या उत्सवाची सांगता साध्या पध्दतीने करण्यात आली असली तरी भाविकांच्या उत्साह कमी झालेला नव्हता.

यळकोट यळकोट जय मल्हारच्या गजराने दुमदुमला. गोदाकाठवरच्या मंदिराच्या भोवती लाकडी बल्ल्या लावून त्यावर कापड बांधण्यात येऊन मंदिरात जाण्याचा मार्ग बंद करण्यात आला होता. मंदिराचे पूजारी सोमनाथ बेळे यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली. पोलिस प्रशासनाच्या सूचनांनुसार मंदिर बंद ठेवण्यात आले होते.

भाविक सकाळपासून मंदिराच्या बाहेरच नारळ वाढून, नैवद्य ठेवून भंडाऱ्याची उधळण करत कपाळी भंडाला लावून दर्शन घेऊन परतत होते. सोबत आणलेले टाक घेऊन वाघ्या मुरळी यांच्याकडून तळी भरून घेण्यात येत होती. मंदिराच्या बाजूच्या परिसरात नारळ आणि भंडाऱ्याची विक्री करण्यात येत होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या