Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedYashwantrao Chavan : ...आणि आचार्य अत्रेंनी यशवंतराव चव्हाण यांची माफी मागितली

Yashwantrao Chavan : …आणि आचार्य अत्रेंनी यशवंतराव चव्हाण यांची माफी मागितली

संयुक्त महाराष्ट्र राज्याचा मंगल कलश घेऊन येणारे भारताचे ५ वे उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री व संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांचा आज ३७ वा स्मृतिदिन. यशवंतरावांनी महाराष्ट्राला केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातही नेतृत्व दिले. यशवंतराव चव्हाण यांनी भारताच्या राजकारणात अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत आणि ते यशस्वीपणे पार पाडले.

भारतातील राजकारणात आणि खास करून काँग्रेस पार्टीमध्ये त्यांच्या कामाचे योगदान अधिक आहे. आधी द्वैभाषिक मुंबई राज्य व नंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करताना त्यांनी राज्याच्या दीर्घ पल्ल्याच्या विकासाचा पाया रचला. त्यांच्या जीवनाबद्दल आज सर्वांनाच माहिती आहे पण, आज आम्ही तुम्हाला असा एक किस्सा सांगणार आहे की जो प्रसंग ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल…!

- Advertisement -

यशवंतराव चव्हाण यांची महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून निवड होत होती. तेव्हा त्यांच्या बद्दल आचार्य अत्रे (Acharya Atre) यांनी त्यांच्या दैनिकात ‘निपुत्रिक यशवंतराव चव्हाणांच्या हाती महाराष्ट्राची धुरा’ अशा प्रकारची हेडींग करून यशवंतराव चव्हाण यांच्यावर टीका केली. या अग्रलेखात यशवंतराव चव्हाण यांच्यावर खालच्या भाषेत टीका करण्यात आली होती. जेव्हा यशवंतरावांनी हा अग्रलेख वाचला तेव्हा त्यांनाही खूप वाईट वाटलं. पण यशवंतरावांनी अत्रेंना थेट उत्तर देणं टाळलं.

दुसऱ्या दिवशी यशवंतराव चव्हाण यांनी आचार्य अत्रे यांना फोन केला आणि सांगितले “अत्रे साहेब मी निपुत्रिक नाही. स्वातंत्र्य संग्रामाच्या लढ्यात इंग्रजांनी माझ्या घरी मला पकडायला धाड टाकली. त्यावेळी माझी पत्नी वेणू ही गरोदर होती. इंग्रजांच्या तावडीत मी सापडलो नाही.याचा राग इंग्रजांनी वेणूताईच्या पोटातील गर्भावर काढला. त्यामुळे वेणूताईंच्या गर्भाशयाला मोठी हानी झाली. त्यामुळे पुन्हा मूल होण्यास अडचण तयार झाली. पण त्यावेळी झाल्या नाही त्यापेक्षा अधिक वेदना आज वेणूताईंना झाल्या आहेत त्याचे मला जास्त वाईट वाटते”.

यशवंतराव चव्हाण यांचे बोलणे ऐकून आचार्य अत्रे यांना खुप वाईट वाटले. इंग्रजांनी केलेल्या अत्याचाराचे उदाहरण म्हणजे यशवंतराव याना मूल नव्हते. यात या जोडप्याची काही चुकी नव्हती. अत्रेंनी क्षणार्धात यशवंतरावांची माफी मागीतली. येवढेच नाही तर यशवंतरावांच्या घरी जाऊन त्यांच्या पत्नी वेणुताई यांचीही माफी मागीतली. पुढे जाहीर सभेमध्ये पण आचार्य अत्रे यांनी यशवंतरावांना निपुत्रिक म्हटले म्हणून जाहीर माफी मागीतली.

राजकारणात सुसंस्कृतपणाचा आदर्श यशवंतराव चव्हाणांच्या ठायी होता. आजच्या ‘ट्रोल’धाडीच्या काळात यशवंतराव चव्हाणांचे स्मरण होण महत्वाचे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या